Home देशविदेश विचार : श्रवण,समीक्षण,मान्यता….

विचार : श्रवण,समीक्षण,मान्यता….

       एखाद्याचे विचार आपण भाषणातून किंवा पुस्तकातून किंवा संभाषण,चर्चा या माध्यमाद्वारे घेत असतो,तसेच ज्ञान हे डोळ्याने पाहून, वाचन करून, तसेच कानाने ऐकून, तसेच स्पर्शाने घेत असतो. जिभेने पण सेव घेऊन पदार्थांचे ज्ञान होते, आपण घेतलेले विचार किंवा ज्ञान हे जसेच्या तसे स्वीकारत असतो, ही आपली चूक असते, कोणतेही विचार किंवा ज्ञान जेव्हा आपण घेतो तेव्हा ते तपासून पाहणे, त्याचे परीक्षण निरीक्षण आणि समीक्षण करणे हे आवश्यक असते, तेव्हाच ते ज्ञान सत्य की असत्य, चूक की बरोबर, योग्य की अयोग्य हे कळत असते, याला व्यवहार म्हणतात. खाजगी जीवनात किंवा संसारिक गोष्टीत आपण व्यावहारिक असतो, पण ज्ञानाच्या क्षेत्रात मात्र अविवाहारीक असतो, वास्तववादी नसतो, म्हणूनच आपण फसतो. जेव्हा आपण दुकानात जातो किंवा भाजीपाला खरेदी करतो किंवा कापड दुकानात जातो कापड खरेदी करतो म्हणजेच जेव्हा आपण ग्राहक म्हणून बाजारात जातो तेव्हा कोणतीही वस्तू विकत घेताना ते निरखून पारखून पाहतो तसेच खरा खीर करून त्याची किंमत पण देत असतो, व्यवहारात एक ग्राहक म्हणून खरेदीदार म्हणून खरेदीदार म्हणजे वस्तू घेणारा ग्राहक आणि वस्तू विकणारा म्हणजे विक्रेता, या दोघांच्या व्यवहारांमध्ये स्पष्टता असते, आणि ती स्पष्टता नसेल तर कोणीतरी कोणाचे तरी फसवणूक करत असतो, पण असा व्यवहार हा विचाराच्या किंवा ज्ञानाच्या क्षेत्रात होताना दिसत नाही, कारण विचार किंवा ज्ञान देणारा यास आपण सही किंवा योग्यच किंवा श्रेष्ठ समजतो ज्ञानिवंत समजतो आणि त्याने दिलेले विचार मग ते भाषणातून असतील किंवा पुस्तकाद्वारे असतील किंवा एक चित्र किंवा शिल्पा द्वारे असतील ते विचार आपण ग्रहण करतो म्हणजे घेतो, घेतो म्हणजे स्वीकारतो असे नाही, विचार घेणे आणि स्वीकारणे यात फारच फरक आहे, तसेच स्वीकारणे आणि मान्यता देणे यात पण फरक आहे. 

      जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचे विचार ऐकतो, घेतो तेव्हा तो जशाचा तसा स्वीकारित असतो त्याचे परीक्षण निरीक्षण समीक्षण करीत नाही, म्हणजेच ते विचार योग्य की अयोग्य, खरे की खोटे, सत्य की असत्य, व्यावहारिकी काल्पनिक, सुखाचे की दुःखाचे, उपयोगाचे की निरुपयोगी, ते विचार आपणास तारणारी की मारणारे ? याचा विचार न करता ते विचार आपण स्वीकारत असतो, नुसते स्वीकारत नसतो तर त्यास लगेच म्हणजे ताबडतोब मान्यता देऊन टाकतो ( sanction ). ही तर खरी आपली चूक असते, हे आपल्या लक्षात येत नाही, जे हुशार क्षणाक्ष आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या असतात तसेच वर्तमान तपासणारे असतात अशा लोकांना मात्र त्या विचारांची पारख होत असते, पितळ आणि सोने यातील फरक यातील फरक त्यांना समजत असतो. पण अशी फारच थोडे माणसे म्हणजे बोटावर मोजण्याएवढीच माणसे असतात. सर्वसामान्य आणि बहुजन समाज हा वाऱ्याच्या दिशेने उधळणार असतो, उगवत्या सूर्याला नमस्कार करणारा असतो. प्रवाहाच्या दिशेनेच पोहणारा असतो. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारे हे विद्रोही असतात, ते का असतात याचा विचार पण सामान्य बुद्धीचे लोक करीत नसतात, ही दुःखाची खेदजनक क बाब आहे. असे घडते म्हणूनच तर अनेक समस्या जन्म घेत असतात. 

    विचार दोन प्रकारचे असतात.1 समतावादी .2 विषमतावादी. 

समतावादी विचार हे स्वातंत्र्य समानता बंधुभाव न्याय समाजवाद धर्मनिरपेक्षता लोकशाही नागरिकाचे आणि देशाचे सार्वभौमत्व यास मान्यता देणारे विचार असतात खरे तर एक प्रकारचा समतावादी विचार म्हणजेच मानवतावादी विचार होय, ज्या विचारात तयार बंधुभाव आहे असा विचार म्हणजे मानवतावादी विचार होय, 

      विचाराचा दुसरा प्रकार म्हणजे अ मानवीय विचार, म्हणजेच विषमतावादी विचार होय, ज्या विचारात स्वातंत्र्य ऐवजी हुकूमशाही आहे, समानते ऐवजी असमानता आहे, ज्या विचारात जातीभेद धर्मभेद लिंगभेद वर्ग भेद आहे, असे विचार म्हणजे विषमतावादी विचार होत. स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय तसेच त्या विचारात संस्कृती नसते तर विकृती असते, अहंकार असतो, हिंसा असते, दया क्षमा शांतीला थारा नसतो, असे विचार म्हणजे विषमतावादी विचार होत, मानवी हक्क आणि अधिकार नाकारून मालक आणि गुलाम अशी व्यवस्था निर्माण करणारे किंवा अशा व्यवस्थेस मान्यता देणारे विचार म्हणजे अ मानवीय विचार, यास विषमतावादी विचार म्हणतात. 

       तेव्हा आपण जेव्हा कोणाचीही विचार ऐकतो वाचतो पाहतो तेव्हा ते विचार विषमतावादी विचार आहेत किंवा विषमतेला खतपाणी घालणारे ते विचार आहेत की, समतावादी विचार आहेत किंवा समतेला खतपाणी घालणारे विचार आहेत, हे तपासून पाहणे आवश्यक आहे. 

      पुरोगामी, परिवर्तनवादी, क्रांतिकारी विचाराचे लोक हे केव्हाही विचार तपासल्याशिवाय ते स्वीकारत नाहीत किंवा आपण जेव्हा आपले विचार लोकांना सांगतात तेव्हा लोकांनाही असे आवाहन करतात की, आमचे विचार जर तुम्हाला पटले तरच घ्या अन्यथा सोडून द्या. उदाहरणार्थ गौतम बुद्ध, फुले, आंबेडकर. हे विशाल विचाराचे प्रवृत्तीचे आणि स्वभावाची माणसे होती म्हणूनच हे महामानव झाले, असामान्य व्यक्ती म्हणून ओळखल्या जाऊ लागले. 

        जे विषमतावादी विचाराच्या असतात, ते संकुचित, स्वयंकेंद्रित, विहिरीतील बेडका सारखे असतात, संकीर्ण दृष्टिकोन आणि स्वभाव असल्यामुळे त्यांना विश्वाची ओळख होत नाही, विश्वाची व्यापकता लक्षात येत नाही, विश्वचिये माझे घर, अशी त्यांची हुतात भावना तयार होत नाही, तर विहीर हेच माझे घर, असे म्हणणारे बेडूक म्हणून जगात वावरत असतात. आणि हे बेडकेच बहुजन अडाणी अज्ञानी देव भोळे धर्मभोळे निराधार मीरा श्री परावलंबी गरीब अशा लोकांना जात देव धर्म याचे महत्त्व पटवून सांगण्याचे विचार देत असतात, 

     आणि यांचे वैशिष्ट्य हे की, आमचे विचार हे आमचे नसून देवाचे आहेत, कुण्या तरी एका मोठ्या संत महंताचे आहेत, असे खोटे बोलून, सर्वसामान्य लोकांना मूर्ख बनविण्याचे काम करतात, जनावरांमध्ये जसे धूत कोल्हे असतात, तसे माणसांच्या जंगलातील हे मानवी कोल्हेच आहेत, लोकांना फसविण्याचा धंदा करीत असतात. आणि सांगतात की,” आम्ही जे विचार सांगतो त्याला प्रमाण देतो, त्याला पुरावा देतो, तो पुरावा म्हणजे तो पुरावा म्हणजे धर्मग्रंथ हेच आहेत, जे ईश्वराने लिहिले आहेत, किंवा संत महात्म्यांनी सांगितलेले विचार आहेत,”असे धादांत चक्क खोटे बोलून लोकांना देव खूप बनविण्याचे काम करतात, लोकांमध्ये अंधश्रद्धा निर्माण करतात, त्याचे कारण म्हणजे स्वतःचे उदरभरण होय, तसेच सत्ता संपत्ती प्रतिष्ठा यासाठी केलेले हे अघोरी प्रयत्न आणि आघोरीकृत्य होय जे विषमतावादी आहे. याच लोकांनी विषमतावादी व्यवस्था तयार केली, समतावादी व्यवस्था नष्ट केली. आणि बहुजनांचा क्षणाचा अन्न पाण्याचा ज्ञानाचा आपल्यातील क्षमता आणि कौशल्य दाखवण्यात चे स्वातंत्र्य , ज्ञान हे सारे हिरावून घेतले, यावर बंदी घातली, शस्त्र बाळगण्याचा हक्क स्वतःकडे ठेवला, शास्त्राचा हक्क पण स्वतःकडेच ठेवला, आणि विषमतावादी व्यवस्था कायम टिकून राहण्यासाठी साहित्यिक विचारवंत कलावंत मीडिया कीर्तनकार कलाकार या सर्वांना विकत घेतले, यांना गुलाम बनविले. 

       गौतम बुद्धांनी सांगितले, अतः दीप भव,तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

  पण केव्हा ? जेव्हा तुला हे कळेल की, मी माणूस आहे, मला बुद्धी आहे, मला मन आहे, माझ्यात क्षमता आणि कौशल्य आहेत, आणि याचा वापर मी माझ्या हितासाठी करीन, मी माझे हित करत असताना, इतरांना दुःख होणार नाही, याची जाणीव पण असेल, याचा साक्षात्कार जेव्हा माणसास होईल, तेव्हाच त्याला ” मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार “हे कळेल. आणि तो कुणाचेही शोषण करणार नाही, कुणावरही अन्याय अत्याचार करणार नाही, विषमतावादी व्यवस्थेला खतपाणी घालणार नाही, उलट ही व्यवस्था नष्ट करून समतावादी व्यवस्था निर्माण होईल यासाठी हा माणूस प्रयत्न करीत राहील, 

      याचा अर्थ ” मी सांगतो ते ऐक,प्रस्न विचार नको,शंका घेऊ नको,मी सांगितलेले विचार, तत्त्वज्ञान, भाषण, कथा कीर्तन तू जसेच्या तसे स्वीकार, त्याची समीक्षा करू नको, आणि त्यास मान्यता देऊन टाक. मी दिलेल्या विचाराची समीक्षा परीक्षा आणि निरक्षण करणे किंवा त्यावर प्रश्न निर्माण करणे हेच पाप आहे,” असे विचार करणारे किंवा विचार देणारे म्हणजे विषमतावादी विचाराचे लोक होत, सर्वसामान्य माणूस आपल्या बुद्धीचा जोपर्यंत उपयोग करीत नाही, म्हणजेच आपण स्वीकारणारे विचार ज्ञान तत्त्वज्ञान धर्मग्रंथ पोथी पुराण यांचे समीक्षण करणार नाही, त्यातील सत्य असत्य शोधणार नाही, तोपर्यंत परिवर्तन शक्य नाही, आणि तोपर्यंत त्या माणसाची आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक परिस्थिती सुधारणार नाही,”ठेविले आनंदे तैसेची रहावे सुखी असू द्यावे समाधान ” या तत्त्वज्ञानानुसार गुलामी हे देवाने किंवा देवानेच मिळालेले आहे, गरीबी ही आपल्या पाचवीलाच पुंजलेले आहे, म्हणून आपण गुलाम आहोत, म्हणून मालक आणि गुलाम ही विषमतावादी व्यवस्था कायम आहे, आणि राहणार आहे.अशी समजत सामान्य माणसाची झालेली आहे, यात जोपर्यंत बदल होणार नाही तोपर्यंत समतावादी व्यवस्था निर्माण होणार नाही. 

       विषमतावादी विचार नष्ट नष्ट होऊन आपण समतावादी विचाराची बनणे, तसेच विषमतावादी व्यवस्था नष्ट होऊन समतावादी व्यवस्था निर्माण होणे किंवा स्थापन होणे, यालाच क्रांती असे म्हणतात, समतेची क्रांती. समतेने विषमते विरुद्ध केलेली ही क्रांती होय. 

       लेखक : दत्ता तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड

            दिनांक : 12 नोव्हेंबर 2025.

               फोन : 9420912209.