युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर येथिल भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक उद्धव नळकांडे यांनी आज (दि. 12) काँग्रेस कार्यालयात तालुकाध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे व शहराध्यक्ष आतिश शिरभाते यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर केला.
उद्धव नळकांडे यांनी पक्ष वाढीसाठी व आगामी निवडणुकीत पक्षाला योगदान देण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले उद्धव नळकांडे यांना शहरातील विविध प्रभागाचा अभ्यासातून त्यांनी पालिकेमध्ये गतकाळात अनेक कामे केली असून सक्रियता दर्शवली होती.
तसेच त्यांचे नातेसंबंध सुद्धा शहरात मोठ्या प्रमाणावर असून त्याचा काँग्रेस पक्षाला निश्चितच फायदा होईल यासह विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त कर्मचारी बांधव त्यांच्या सोबतीला असून आगामी निवडणुकीत पुन्हा त्याच जोमाने उतरणार असल्याचे व्यक्त होत आहे.
प्रवेश करतेवेळी सुधाकर पाटील भारसाकळे अध्यक्ष दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटी आतिश शिरभाते अध्यक्ष दर्यापूर शहर काँग्रेस कमिटी, ईश्वर बुंदिले महासचिव अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी, जम्मु भाई पठाण अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग शहर,माजी नगरसेवक रामेश्वर तांडेकर,असलम मंसूरी, सागर काळे, सोनू शहा, इरफान इनामदार,डिगंबरराव राठोड, सुधाकर भारती,अशोकराव राखोंडे, नंदकिशोर मेहेरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



