Home Social छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी...

छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी तसेच माहिती अधिकार सप्ताह संपन्न.

युवराज डोंगरे/खल्लार

        उपसंपादक 

       छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगाव पूर्णा येथे दि. 11 ऑक्टोबरला राज्यशास्त्र विभागाद्वारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 57 वी पुण्यतिथी तसेच माहिती अधिकार सप्ताह निमित्य अतिथी व्याख्यान संपन्न झाले.

         कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.भारत कल्याणकर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.प्रविण सदार हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.रविंद्र इचे होते.

         कार्यक्रमाचे आयोजन सूत्रसंचालन,प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.आशिष काळे यांनी केले,आभार कु.श्रुती इंगळे हिने केले,कार्यक्रमाला प्रा.विपिन लिल्हारे, प्रा.अक्षय मोने,प्रा.अतुल चऱ्हाटे रासेयो स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.