युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :- राज्यामध्ये जि. प., पं. स. तसेच नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नगर पंचायत, नगरपालिका अध्यक्षपद तसेच सदस्य पदासाठी आरक्षण निश्चित झाले आहे.
या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत येत आहे याकरता इच्छुकांनी शुल्कासह अर्ज दाखल करण्याचे आवाहन दर्यापूर काँग्रेस शहर अध्यक्ष आतिष शिरभाते यांनी केलेले आहे.
सदर अर्ज हे पक्षाच्या शहराध्यक्ष यांच्याकडे उपलब्ध आहे, अर्ज काँग्रेस शहराध्यक्ष त्यांच्याकडे जमा करावे व,अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्रे जोडणे बंधनकारक असून, आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा निवड मंडळाच्या बैठकीबाबत पुढील सूचना देण्यात येतील.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारिख दि.19 ऑक्टोबर ही राहील अशी माहिती आतिश शिरभाते यांनी दिली.



