तालुकातील ग्रामीण व शहरात मस्कऱ्या गणपती ची धूम ३४ ठिकाणी स्थापना… — विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन…

कमलसिंह यादव 

प्रतिनिधी

        पारशिवनी:-शहरासह तालुक्यात काही प्रमुख गावांमध्ये मस्कऱ्या गणपतीची धूम दिसून येत आहे. तालुक्यात एकूण ३४ ठिकाणी सार्वजनिक मस्कऱ्या गणपतीची स्थापना करण्यात आली असून, त्यात पारशिवनी शहरातील १० आणि ग्रामीण भागातील २४ मस्कऱ्या गणपतींचा समावेश आहे. बहुतांश ठिकाणी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. गणपती बाप्पाला अनंत चतुर्दशीला (दि. २८ सप्टेंबर) निरोप दिल्यानंतर संकष्ट चतुर्थीला (दि. २ ऑक्टोबर) मस्कऱ्या गणपतीची थाटात स्थापना करण्यात आली. १० दिवस चालणाऱ्या या उत्सवात पारशिवनी शहरा चे १२ सह ग्रामिण भागात २४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळां प्रमाणे मस्कऱ्या गणपती उत्सव मंडळां द्वारे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले जात आहे. बच्चाकंपनीं पासून ज्येष्ठांपर्यंतची मंडळी या कार्यक्रमांचे लाभ घेताना दिसत आहे.

          पारशिवनी शहरातील दिवटे नगर, प्रभाग क्रमाक१२, प्रभाग क्रमाक१४, सोनार मोहल्ला प्रभाग क्रमाक७, मारवाडी मोहल्ला, नागठाणा मंदिर प्रभाग क्रमांक१०, दत्त टेकडी पेंच रोड प्रभाग क्रमांक३, गोवारी पुरा प्रभाग१३, ढिवर मोहल्ला,सह पारशिवनी तालुक्यातील ग्रामिण भागातील सिंगोरी, नयाकुंड, मेहंदी, आमगांव, पेच नवेगावखैरी, बाबुलवाडा , निबा, गरंडा , डुमरी कला, पालोरा, सुवरधरा, तामसवाडी, पेढरी, बच्छेरा, हेटीटोला, दहेगाव जोशी, करंभाड, पारडी, माहुली, पिपळा बखारी, सुरेरा कोलितमारा व अन्य गावांमध्ये मस्कऱ्या गणपतींची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती मंडळांच्या पदाधि काऱ्यांनी दिली असून, याला मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कमी मस्कऱ्या गणपतींची स्थापना झाल्याची माहिती पारशिवनी पोलिस ठाण्यातील गोपनीय विभाग प्रमुख पृथ्वीराज चौहान यानी दिली.

          मस्कऱ्या गणपती उत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. याची मंडळाच्या सदस्यां सोबत इतर प्रत्येकाने काळजी घ्यावी. लाऊड स्पीकरचा आवाज कमी असावा. आक्षेपार्ट देखावे तयार करू नये. वीजपुरवठा घेण्यासाठी महावितरण कंपनीची परवानगी घ्यावी. रोडवर मंडप टाकून नये. रहदारीस अडसर निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, आदी अनेक सूचना मंडळाच्या पदाधिकायांना देण्यात आल्या आहेत.

– राहुल सोनवने , ठाणेदार, पोलिस ठाणे, पारशिवनी.