भारतीय नागरिकांसाठी माहितीचा अधिकार कायदा ठरु लागलाय समाज व देशहितोपयोगी.:- डॉ. प्रशांत सातपुते..

 

युवराज डोंगरे/खल्लार

 छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे दि ११ऑक्टोबर रोजी राज्यशास्त्र विभागाद्वारे आयोजित माहिती अधिकार सप्ताह ६ ते १२ ऑक्टोबर २०२३ रोजी अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

       सुरुवातीला गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्लार्पण करण्यात आले.या व्याख्यानाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.प्रशांत सातपुते राज्यशास्त्र विभाग प्रमुख गो.सी.टोम्पे महाविद्यालय चांदूरबाजार यांनी या प्रसंगी असे सांगितले की हा कायदा १५ जून २००५ रोजी तयार झाल्यापासून १२० व्या दिवशी म्हणजे १२ ऑक्टोबर २००५ रोजी अमलात आला.

         या कायद्यातील काही तरतुदी ताबडतोब अमलात आणण्यात आल्या,माहितीचा अर्थ हा कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य असा असून त्यामध्ये अभिलेख,दस्तऐवज ज्ञपण,ई-मेल,अभिप्राय,सूचना,प्रसिद्धीपत्रके, परिपत्रक,आदेश,रोजवाहया, संविधा,अहवाल,कागदपत्रे,नमुना, प्रतिमान कोणत्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील आधारसामग्री अधिकाऱ्यांच्या अथवा मंत्राचे अभिप्राय हे सर्व होय.

           ही माहिती त्याकाळी अमलात असेल त्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये सार्वजनिक प्रधिकरणाकडून मिळविता येते.या कायद्यातून गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांना वगळण्यात आले.

         भारत अशा प्रकारचा कायदा करणारा जगातील १५४ वा देश आहे.महाराष्ट्रातील सामान्य नागरिका पर्यंत सर्व सरकारी माहिती सुलभपणे पोहोचवणे हे माहिती आयोगाचे कर्तव्य आहे,अर्ज कसा करावा, अर्ज कुठे करावा,किती दिवसात माहिती मिळते,अर्ज कसा असतो हा नमुना सुद्धा सरांनी या ठिकाणी दाखविला. कोणत्या माहितीसाठी अर्ज केला जातो याबाबत प्रतिपादन केले.

          व्याख्यानाचे अध्यक्ष डॉ. भारत कल्याणकर यांनी सांगितले की माहिती अधिकार अधिनियम दप्तर दिरंगाई सेवा हमी कायदा हे सुशासनासाठी शासनाने निर्माण केलेले उत्तम कायदे आहेत.सुशासनाच्या या त्रिसूत्री मधील माहिती अधिकार कायदा नागरिकांना मिळालेले शस्त्र आहे.यामुळे शासन आणि प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होते.

        परंतु प्रशासनाच्या मदतीशिवाय हा कायदा चांगल्या प्रकारे राबविता येत नाही,माहितीचा अधिकार हा प्रशासनाच्या उत्तरदायित्वासाठी आहे,कोणाच्या उदरनिर्वाहाचे ते साधन होऊ शकत नाही असे प्रतिपादन केले.

      या कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक डॉ. आशिष काळे राज्यशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले. सूत्रसंचालन कु.पूजा भटकर आभार शुभम आमझरे यांनी केले.या व्याख्यानाला डॉ. रवींद्र इचे उपस्थित होते.

        हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता आयोजकांनी श्रम घेतले.या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.