देसाईगंज तालुका व शहरातील मुस्लिम बांधवानी हिंदू-मुस्लिम धार्मिक जातीय सलोखा व ऐक्य करिता ईद-ए-मिलाद उत्सव साजरा करणेबाबत घेतला ऐतिहासिक निर्णय..

 

ऋषी सहारे

संपादक

           देशात सर्व जाती धर्माचे लोक राहतात.अशा वेळी एकाच दिवशी अनेक धर्माचे सण येण्याचे प्रसंग येत असतात. यातुन आपण कसा मार्ग काढतो? यावर जातीय सलोखा टिकुन असतो. 

              असाच एक सामंजस्याचा प्रकार देसाईगंज शहरात घडुन आला आहे. यावर्षी अनंत चतुर्थी गणेश मूर्ति विसर्जन आणि प्रेषित हजरत महम्मद पैगंबर यांची जयंती म्हणजे ईद-ए-मिलाद जुलूस हे दोन्ही सण एकाच दिवशी दिनांक २८/९/२०२३ रोजी साजरे होणार आहेत. 

         त्यामुळे दोन्ही कार्यक्रम शांततेत साजरे व्हावे व हिंदू-मुस्लिम सामाजिक / धार्मिक सलोखा कायम राहावा यासाठी दिनांक ११/९/२०२३ रोजी पोस्टे देसाईगंज येथे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या उपस्थितीत शहरातील मस्जिद ट्रस्टचे मुख्यपदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. 

         सदर बैठकीत पोलीसांनी अनंत चतुर्थी आणि ईद-ए-मिलाद उत्सव व जुलूस मिरवणुक एकाच दिवशी असल्याने ईद-ए-मिलाद जुलूस दिनांक २८ ऐवजी २९ सप्टेंबर २०२३ रोजी काढल्यास हिंदू- मुस्लिम ऐक्याची भावना निर्माण होईल, असा विचार मांडला. या विचाराचा उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी एकमताने स्विकार करुन देशात सर्वत्र दिनांक २८/९/२०२३ रोजी ईद-ए-मिलाद सण साजरी होत असताना सुध्दा धार्मिक जातीय सलोखा, सामाजिक ऐक्य व बांधिलकी दाखवत दिनांक २९/९/२०२३ रोजी ईद-ए-मिलाद उत्सव व जुलूस काढण्याचे ठरविले. 

            गडचिरोली जिल्हा तथा देसाईगंज तालुका यामध्ये अशा प्रकारची धार्मिक / जातीय सलोखा जपण्याची पहीलीच वेळ आहे. त्यामुळे हा एक ऐतिहासिक निर्णय असुन देसाईगंज शहरातील मुस्लिम समाज बांधवानी घेतलेल्या या निर्णयाला सर्वत्र हिंदू बांधवाकडून स्वागत केले जात आहे.

            यावेळी मस्जिद ट्रस्टचे मोहम्मद आरीफ पटेल,सिंकदरखॉ मोहम्मद खाँ,अकबर कादर हाजी अहम्मद हमीद कुरेशी,रज्जाक खान हूसैनी,सय्यद अबीद अल्ली,अब्दुल रज्जाक,मोहम्मद आमीन यशीम,मिराज रिजवन बैग,सादीक शेख,सय्यद इस्लमुद्दीन,मोहम्मद साजीद खोराजिया,शकील जमील शेख, शाकीर लतिफ शेख,तंवगर फारुख कुरेशी असे पदाधिकारी उपस्थित होते.