काल वाघाने  केले ठार तर आज बिबट्याने केला शेतकऱ्यांवर हल्ला… — शेतकरी गंभीर जखमी…

 

ऋषी सहारे

संपादक

 

आरमोरी तालुक्यातील लोहारा येथील शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज घडली. बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये शेतकरी झाला असून जखमी शेतकऱ्यावरती आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे मिळालेल्या माहितीनुसार समजते.

        आरमारी तालुक्यातील पोरला वन क्षेत्रातील सिर्सि बीट अंतर्गत लोहारा येथील शेतकरी नामे सुनील वक्तूजी मेश्राम हे दिनांक १२/ ०९ /२०२३ मंगळवार रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान आपल्या स्वतःच्या सर्वे नं.५/२ शेतामध्ये शेताचे कामे करण्याकरिता गेले होते.

        मात्र शेतामध्ये काम करीत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने सुनील मेश्राम या शेतकऱ्यावरती बिबट्याने अचानक हल्ला केला या हल्ल्यांमध्ये त्याला गंभीर दुखापत झाली असून शेतकऱ्याला वनविभागाच्या कर्मचारी बीटचे क्षेत्र सहाय्यक बोगा, वनरक्षक गडपायले, वनरक्षक श्रीकांत सेलोटे यांनी आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.

         मात्र प्रकृती धोक्यावर असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. पुढील घटनेचा तपास वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल होऊन सुरू असल्याचे समजते.

          बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याला वनविभागाच्या वतीने योग्य ती आर्थिक नुकसान भरपाई द्यावी आणि या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी लोहारा वासीयां कडून व परिसरातील लोकांकडून मागणी होत आहे.