खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास – डॉ. ब्रह्मानंद करंजेकर….

नागपूर विभागीय प्रतिनिधी ऋग्वेद येवले

            साकोली : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा, तालुका बहुविध क्रीडा परिषद साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय १४, १७ व १९ वर्षाखालील मुले यांची खो- खो स्पर्धा वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या भव्य पटांगणात आयोजित करण्यात आली होती.

         स्पर्धेचे उद्घाटक डॉ. ब्रह्मानंद करंजेकर प्रमुख अतिथी तालुका संयोजक तुषार मेश्राम, डॉ. वृंदाताई करंजेकर, वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी, व व तालुक्यातील क्रीडा शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धेत तालुक्यातील सानगडी, जांभळी, साकोली, जमनापूर येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या संघाने सहभाग घेतला होता.

         यावेळी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना डॉ. ब्रह्मानंद करंजेकर यांनी मार्गदर्शनातून सांगितले की खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो निर्णयक्षमता,सहानुभूती, शिस्त आणि सहकार्याची भावना निर्माण होते आणि या गुणाच्या बळावर व्यक्ती कोणतीही कार्य करण्यास सक्षम होतो हे मोलाचे विचार विद्यार्थ्यासमोर व्यक्त केले.

         कार्यक्रमाचे संचालन श्री राजेश कापगते तर आभार अमोल वाकडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता तालुक्यातील विद्यालयातील शारीरिक शिक्षक व सहाय्यक शिक्षक यांचे सहकार्य लाभले.