श्री ज्ञानेश्वर विद्यालयात पालक – शिक्षक संघाची कार्यकारिणी निवड जाहीर…

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

      आळंदी : श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे पालक – शिक्षक संघ कार्यकारणी निवड सभा सोमवार दिनांक (१०जुलै) रोजी पार पडली. या संघाच्या मार्फत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी सोडविणे, योग्य त्या उपाययोजना सुचविणे, अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यासाठी सहाय्य करणे, नियोजनानुसार अभ्यासक्रम पूर्ण झाल्याची खात्री करणे, सहशालेय उपक्रमांना मान्यता देणे इत्यादी कार्य केले जाते. 

        याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, प्रशालेचे प्राचार्य दिपक मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, पर्यवेक्षिका अनिता गावडे, पालक प्रतिनिधी,शिक्षक उपस्थित होते. त्यानंतर पालक – शिक्षक संघाच्या कार्यकारिणीची निवड सर्व वर्ग पालक प्रतिनिधी मधून लोकशाही पद्धतीने पार पडली. त्यामध्ये पदसिद्ध अध्यक्ष हे विद्यालयाचे मुख्याध्यापक असतात. म्हणून पालक – शिक्षक संघाचे अध्यक्ष दिपक मुंगसे व उपाध्यक्षपदी शिवकन्या प्रकाश मोरे यांची तर सचिव म्हणून शशिकला वाघमारे व सहसचिव उद्धव डिघुळे यांची निवड झाली. 

         संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी मनोगतातून पालक शिक्षक संघाच्या कार्यकारणीतील नियुक्त सर्व पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन केले. तसेच शाळेच्या यशाचा चढता आलेख व्यक्त करत शालेय भौतिक सुविधा व शाळेतील उपक्रमाविषयी माहिती सांगितली. त्यानंतर प्रशालेचे प्राचार्य – पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष दिपक मुंगसे यांनी पालक शिक्षक संघाचा उद्देश व कार्य याविषयी सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन सूर्यकांत खुडे यांनी केले व पर्यवेक्षक राठोड सर यांनी आभार व्यक्त केले.