आज लाखनीत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार… — माजी आमदार सेवकभाऊ वाघाये यांच्या वाढदिवसानिमित्त १३ जूनला आयोजन…

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

       साकोली / लाखनी : ओबीसी बहुजन महासंघ संस्थापक अध्यक्ष, धान कडधान उत्पादक शेतकरी संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सेवकभाऊ वाघाये ( पाटील ) यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार ( १३ जून ) १० वी १२ तील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा बावणे कुणबी समाज सभागृह, केसलवाडा फाटा लाखनी येथे दू. ०२ वाजता आयोजित करण्यात आला आहे. सदर विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन लक्ष्मी शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यवाह विलास वाघाये, आयोजक आदित्य वाघाये व अजिंक्य वाघाये आणि सेवकभाऊ वाघाये साकोली – लाखनी मित्र परिवारांनी केले आहे.