भव्य हायड्रॉक्सीयुरीया उपचार शिबीर संपन्न…

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

 गडचिरोली,(जिमाका)दि.12: सार्वजनिक आरोग्य विभाग गडचिरोली व अनुराधा पौडवाल यांच्या सर्योदया फोंडेशन मार्फत सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दि. 11 जून 2023 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे सिकलसेल ग्रस्त (SS) रुग्णांचे तपासणी शिबीराचे आयोजन केले होते. सदर शिबीराकरीता फोंडेशन मार्फत डॉ. अनुराधा श्रीखंडे President, Sickle cell Association Nagpur व सार्वजनिक आरोग्य विभाग गडचिरोली याच्या मार्फतिने जिल्हा सामान्य रुगणालय गडचिरोली येथे दि. 11 जून 2023 ला सदर शिबीराचे आयोजन करुन सदर शिबीरामध्ये रुग्णांची (CBC, LFT, KFT, HB) सिरम थेरपी, तपासणी करण्यात आलेली आहे. तसेच आवश्यक औषधी व Tab. Hydroxyurea वाटप करण्यात आलेले आहे. तसेच तज्ञ वैद्यकिय अधिकारी यांचे कडून सिकलसेल ग्रस्त रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार बाबत मदिर्शन करण्यात करण्यात आलेले आहे. या शिबीरामध्ये खालील प्रमाणे सिकलसेल ग्रस्त रुग्णांना सेवा उपलब्ध करुन देण्यात आले. एकुण 220 रुग्णांची नोंदनी करण्यात आली. 155रुग्णांचे रक्त तपासणी करीता नमुणे घेण्यात आले. 184 रुगणांना Tab. Hydroxyurea व Tab folic Acid वाटप करण्यात आले. सोबत आवश्यक औषधी वाटप करण्यात आली. तसेच 39 सिकलसेल रुग्णांचे आभा कार्ड व 15 गोल्डन कार्ड काढण्यात आले. गडचिरोली तालुक्यातील 60 आरामोरी 20 चामोर्शी 23 धानोरा 40 कोरची 2 वडसा 9 कुरखेडा 8 तसेच भामरागड, मुलचेरा, एटापल्ली तालुक्यातील रुग्णांनी या शिबीराचा लाभ देण्यात आलेला आहे. या. कार्यक्रम चे अध्यक्ष डॉ. सतिश सोलंकी, जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय गडचिरोली, हे होते तसेच प्रमुख अतिथी व मार्गदर्शक डॉ. अनुराधा श्रीखंडे President, Sickle cell Association Nagpur अ यांनी रुगणांना सिकलसेल आजार व Tab. Hydroxyurea उपचाराबाबत माहिती दिली. तसेच डॉ दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हापरीषद गडचिरोली, यांनी सिकलसेल रुग्णांनी नियमित औषधोपचार घ्यावे. व त्यांच्या सर्व नातेवाईकांची सिकलसेल तपासणी करण्यात यावी तसेच विवाह पूर्व सिकलसेल पासणी करुण्यात यावी असे आवाहन उपस्थित जनतेला केले. डॉ. बागराज धुर्वे वैद्यकिय अधिकारी (बाहय रुग्ण तपासणी), डॉ. माधूरी किलन्नाके वैद्यकिय अधिकक्षक जि. महिला व बाल रुग्णालय गडचिरोली, डॉ. गदेवते, डॉ मनिष मेश्राम, डॉ पंकज हेमके व डॉ सुनिल मडावी, तालुका आरोग्य अधिकारी, गडचिरोली, डॉ. राहूल थिगळे जि.कार्यक्रम व्यवस्थापक रा. आ. अ कार्यक्रमला उपस्थीत होते.रुग्णांची तपासणी डॉ. चलाख बालरोग तज्ञ, डॉ. विनोद चव्हान, डॉ. मानकर, डॉ. उके, डॉ अडगिलवार, डॉ. अनुजा हरंडे व डॉ. साईप्रिया यांनी केली. तसेच सिकलसेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ स्वप्नील चापले व इतर सर्व सिकलसेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ व एच. एल. एल तंत्रज्ञ व डॉ साखरे शरीर विकृती शास्त्र, सामान्य रुग्णलय गडचिरोली यांनी रुग्णंचे रक्त नमुने घेवून तपासणी केली. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत रुगणांचे गोल्डन कार्ड काढण्यात आले. तसेच नोंदनी कक्षात रुग्णांची नोंद करुन आभा कार्ड कढण्यात आले. डॉ. मृणाली रामटेके रुग्णालय वस्थापक यांनी शिबाराचे व्यवस्थापन केले. तसेच कार्यक्रमाचे संचालन अजय खैरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रचना फलझेले जिल्हा सिकलसेल समन्वयक यांनी केले. तसेच सिकलसेल समुपदेशक निता बालपांडे, NCD जि.समन्वयक व कर्मचारी, RBSK जि. समन्वयक व टिम RKSK समन्वयक व रुग्णालयातील सर्व परीचारीका अधिपरीचारीका, कर्मचारी, नर्सिंग स्कुल, सिकलसेल पिअर सपोर्ट सर्व यांनी सदर शिबीर यशस्वी करण्यास सहकार्य केले.