मुरूम बारामती येथील महिला भगीनी यांनी अक्कलकोट येथील स्वामी महाराजांच्या चरनी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला.

नीरा नरसिंहपुर दिनांक 12

प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,

      मुरूम तालुका बारामती येथील महिलांनी अक्कलकोट येथील नवसाला पावणारे व भाविकांचे श्रद्धास्थान स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेऊनआशीर्वाद घेतला. स्वामी महाराज यांची महाराष्ट्र व राज्याबाहेर देखील मोठे प्रसिद्ध देवस्थान आसल्यामुळे या धार्मिक क्षेत्राची ओळख व प्रसिद्धी मोठी आहे.

         म्हणूनच दररोज लाखो भावीक अक्कलकोट येथे नतमस्तक होऊन दर्शनाचा लाभ घेत आसतात. राज्य शासनाने नुकताच 50% महिलांसाठी एसटी चार्ज मोफत केल्यामुळे महिला राज्य मोठ्या संख्येने एसटी महामंडळा मध्ये प्रवास करू लागले आहेत. धार्मिक क्षेत्राची आवड व राज्य शासनाने एसटीमध्ये केलेली 50% ची सवलत याच उद्देशाने मुरूम बारामती येथील महिला,,, संजीवनी शिंदे, शकुंतला शिंदे, साधना शिंदे, लिलावती ताई ,सहित या सर्वांना धार्मिक क्षेत्राची आवडही आहे. तसेच या सर्व महिलांनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन व पंढरपूर येथील विठुरायाचे दर्शन मनोभावाने नतमस्तक होऊन दर्शनाचा आनंद घेतला.