अखेर अमरावती- सोनगाव बस सुरु.. — बसचे पूजन,चालक वाहकांचा सरपंचांनी केला सत्कार.. — प्रवाशी वर्गात आनंद..

 

युवराज डोंगरे/खल्लार

     उपसंपादक 

   कोरोना काळापासून बंद असलेली अमरावती आगार क्र 2 ची अमरावती सोनगाव हि मुक्कामी बस फेरी दि. 11 जुनपासून सुरु करण्यात आली असून या बसचे कसबेगव्हान येथे पूजन करुन चालक व वाहकांचा शाल श्रीफळ देऊन गावाचे प्रथम नागरिक शशिकांत मंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

       अमरावती आगार क्र 2 ची अमरावती शिंगणापूर, चंडिकापूर, खल्लार, कसबेगव्हान, कापूसतळणी सोनगाव हि बस कोरोनाआधी नियमितपणे अमरावती आगार क्र 1 मधून संध्याकाळी 7 वाजता निघत होती या मार्गावरील प्रवाश्यांच्या खूपच सोयीची हि बस फेरी होती.

      या बसचे उत्पन्नही चांगल्या प्रमाणात रा.प.मंडळास होते. मात्र कोरोनाकाळापासून हि बस बंद करण्यात आली होती. कोरोना संपल्यावर या मार्गावरील परिवहन मंडळाच्या सर्व फेऱ्या सुरु करण्यात आल्या होत्या मात्र हि बसफेरी सुरु करण्यात आली नव्हती.

      हि बस सुरु करण्यात यावी असे वृत्त स्थनिक वृत्तपत्रात दि 8 मे रोजी प्रकाशित करण्यात आले होते.

     कसबेगव्हान येथील कर्तव्यदक्ष सरपंच तथा अंजनगाव पं स माजी सभापती शशिकांत मंगळे यांनी कोरोनाकाळापासून बंद असलेली बसफेरी सुरु करण्यात यावी यासाठी विभाग नियंत्रक अमरावती यांच्याकडे दि 15 मे ला चर्चा करुन निवेदन सादर केले होते. 

     बस सुरु न झाल्यास नियंत्रक यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला होता.

     विभाग नियंत्रक यांनी अमरावती सोनगाव हि बस 1 जुनपासून सुरु करण्यात येईल असे सांगितले.1जुनपासून बस सुरु झाली नाही त्याचा पाठपुरावा शशिकांत मंगळे यांनी विभाग नियंत्रक यांच्याकडे केला अखेरीस 11 जुनपासून हि बस सुरु करण्यात आली.

     कोरोनानंतर शेवटची असलेली अमरावती सोनगाव हि मुक्कामी बसफेरी पहिल्यांदा या मार्गावर धावली हि बस कसबेगव्हान येथे पोहचताच गावातील गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. 

      महिलांनी बसचे पूजन केले तर कर्तव्यदक्ष सरपंच शशिकांत मंगळे यांनी बसवरील चालक व वाहक यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

      हि बस सुरु झाल्यामुळे कापूसतळणी,कसबेगव्हान, खल्लार, चिंचोली शिंगणे, साखरी, गौरखेडा, चंडिकापूर व इतर गावातील प्रवाशांना अमरावतीला जाणे व येणे सोयीचे झाले आहे.

**

      कोट

— सर्वसामान्यांची कामे मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न..

   कोरोना काळापासून प्रवाशांनाच्या खूपच सोयीची असलेली हि बस फेरी सुरु करण्यात यावी यासाठी विभाग नियंत्रक अमरावती यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली होती.त्यांनी लवकरच बस सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. दि.11 जुनला कोरोना नंतर हि बस सुरु करण्यात आली.सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लावण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न…

शशिकांत मंगळे

सरपंच, ग्रा पं कसबेगव्हान, तथा माजी सभापती पं स अंजनगाव.