राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
वडसा-देसाईगंज तालुक्यातील मौजा कोंढाळा येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीचा उल्लेख करत त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करून समाजाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी,तसेच शिक्षण,संघटन आणि संघर्ष या तत्वांचा अवलंब करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणावा,असे आवाहन त्यांनी केले.

या कर्यक्रमास अध्यक्ष म्हणून आमदार रामदासजी मसराम,माजी सभापती परसरामजी टिकले,माजी उपसभापती नितीन राऊत,काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष (आरमोरी) मिलिंद खोब्रागडे,नगरसेवक तथा गटनेता विकास प्रधान,नगरसेवक राजूभाऊ रासेकर,धनपाल मिसार सर,सरपंच अर्पणा राऊत,उपसरपंच गजानन सेलोटे,नगरसेवक पिंकू बावणे,नितीन मोहुर्ले,अरुण कुंभरवार,संदीप वाघाडे,कैलास वानखेडे,सागर बन्सोड,विजय पिल्लेवान आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक,महिला,युवक उपस्थित होते.




