Home शैक्षणिक ग्रामगीता महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी समजून घेतली आयसीटीसीच्या कार्यपद्धत…

ग्रामगीता महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी समजून घेतली आयसीटीसीच्या कार्यपद्धत…

शुभम गजभिये

विशेष प्रतिनिधी…

        11 फेब्रुवारी,2026,रोज बुधवारला, डॉ.सुनंदा आस्वले प्राचार्य ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर आणि डॉ.अश्विन आगडे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय चिमूर यांच्या मार्गदर्शनाखाली,ग्रामगीता महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लबच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील आयसीटीसी आरएच केंद्राला भेट दिली. 

         मिस कामिनी हलमारे (आयसीटीसी, समुपदेशक) आणि श्री. सुमेध साखरे (आयसीटीसी, समुपदेशक) यांनी आयसीटीसीच्या कार्याचे प्रात्यक्षिक दाखवले.

         भेटीदरम्यान त्यांनी आयसीटीसीच्या प्रयोगशाळेतील काम (एचआयव्ही, सिकलसेल चाचणी इ.), एचआयव्ही/एड्सच्या गैरसमज आणि मिथकांसाठी समुपदेशन केले.

        ग्रामगीता महाविद्यालयाचे डॉ.निलेश ठवकर (आरआरसी संयोजक), डॉ.मृणाल वऱ्हाडे आणि श्री.विवेक माणिक आणि रेड रिबन क्लबचे २० विद्यार्थी भेटीसाठी उपस्थित होते.यात त्यांनी सक्रियपणे भाग घेतला.