सामाजिक परिवर्तनामध्ये संतांचे योगदान मोठे आहे :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी… — आळंदी देवस्थानच्या ‘ज्ञानभूमी भक्तीपीठ’ प्रकल्पाचे भूमिपूजन…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला पसायदान आणि त्याच्यातला प्रत्येक शब्द आणि त्याचा अर्थ हा प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये त्याचे आचरण करत असतो, संतांनी महाराष्ट्राचं सांस्कृतिक, धार्मिक व अध्यात्मिक महत्त्व त्यांच्या विचाराने कार्यकर्तृत्वाने वाढवलेला आहे. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या प्रेरणेतून मूल्याधिष्ठित अध्यात्मिक आणि धार्मिक जे संस्कार आपलं व्यक्तित्व जीवन बदलणारे आहेत तसेच संतांचे सामाजिक परिवर्तनामध्ये मोठे योगदाद आहे. असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आळंदी येथे बोलताना व्यक्त केले.

           संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या नियोजित ज्ञानभूमी भक्तीपीठ या प्रकल्पातील फेज वन चे भुमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हभप मारुती महाराज कुऱ्हेकर, डॉ.नारायण महाराज जाधव, आमदार दिलीप मोहिते पाटील, महेश लांडगे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विकास ढगे पाटील, योगी निरंजननाथजी, डॉ.भावार्थ देखणे, ॲड.राजेंद्र उमाप, लक्ष्मीकांत देशमुख, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी विश्वस्त डॉ.सारंग जोशी, प्रशांत सुरू तसेच आळंदीकर ग्रामस्थ, वारकरी महाराज मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.

           यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितले की जगामध्ये कुठल्याही धर्माच्या स्थानी जा त्या ठिकाणी शुद्धता, स्वच्छता, चांगले रस्ते, उत्तम धर्मशाळा सर्व प्रकारच्या चांगल्या सुविधा असतात परंतु आपली जी मंदिरे व तीर्थस्थान आहेत ते जेवढी चांगली असायला पाहिजे तेवढे अजून पर्यंत आपण करू शकलो नाही.