राजेंद्र मुळक सहायता कक्ष आपल्या दारी अंर्तगत आरोग्य व शासकीय योजना शिबिराला खंडाळा (मरियम) येथे उत्स्फूर्त प्रतिसाद.

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:- पारशिवनी तालुका अंतर्गत मौजा खंडाळा (मरियंबी) येथे श्री.राजेंद्र मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांच्या “राजेंद्र मुळक सहायता कक्षाच्या माध्यमातून,गावातील गरजू लोकांसाठी आज आरोग्य शिबीर जनहितार्थ घेण्यात येत आहेत.

       शिबिरातंर्गत विविध योजनांचा लाभ जनतेला मिळावा या करीता शुक्रवारी मौजा खंडाळा (मरियंबी) येथे गावात मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली,यात नेत्र तपासणी तथा निःशुल्क चष्मा वाटप करण्यात आले.

       याचबरोबर राशन कार्ड,निराधार योजना नोंदणी,ई श्रम कार्ड,इलेक्शन कार्ड,पॅन कार्ड व आयुष्यमान कार्ड इत्यादी योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळवून देण्यात आले.

      यावेळी सौ.अर्चनाताई भोयर (जि.प.सदस्य), सौ.मंगलाताई निंबोणे(प.स. सभापती), श्री.चेतनजी देशमुख(प.स. सदस्य), श्री.किशोर मिरे, श्री.संजय कोडवते( सरपंच ग्रा.पं. खंडाळा), श्री.इंद्रपाल बोरकर, श्री.रोशन महल्ले, श्री. श्री.इंद्रपाल गोरले,.श्रीराम गोनमारे, श्री. गजानन मेंघर, श्री.शंकरराव ठाकरे, श्री. प्रभाकर महल्ले, श्री.घनश्याम गोनमारे, श्री.नारायण ठाकरे, श्री.छत्रपाल मानकर, श्री.गिरीश पांडे, श्री.मुकेश लांजेवार, श्री.सोमेश्वर प्रगट इत्यादी मान्यवर व ग्रामवासी गण उपस्थित राहून ग्रामवासीयांनी शिबिराचा लाभ घेतला.