प्रदूषणमुक्त व पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करा – प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे… — समर्थ महाविद्यालयाचे विद्यार्थी व कर्मचारी यांचा शपथपूर्वक संकल्प…

चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी

         लाखनी :- स्थानिक समर्थ महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाचा स्वच्छ दिवाळी-शुभ दिवाळी अभियानातंर्गत महाविद्यालयाने प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी सर्व प्राध्यापक, कर्मचारी , विद्यार्थी यांना प्राचार्य डॉ दिगांबर कापसे यांनी शपथ दिली.

          सोबतच दिवाळीच्या निमित्ताने सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. त्यामुळे प्रदूषण वाढून अनेक आजार उद्भवतात, आवाजामुळे वयोवृद्ध व्यक्तींना लहान मुलांना त्रास होतो. तसेच मुक्या प्राण्यांना सुद्धा त्रास होतो दिवाळी हा आनंदाचा सण आहे. तो प्रत्येक नागरिकाने आदर्शवत साजरा करावा असे आवाहन प्राचार्य डॉ दिगांबर कापसे यांनी केले.

          तसेच याप्रसंगी सर्व उपस्थितांना स्वच्छ दिवाळी-शुभ दिवाळी साजरी करण्यासाठी शपथ दिली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अजिंक्य भांडारकर प्रास्ताविक डॉ. धनंजय गभणे तर आभार प्रदर्शन प्रा. धनंजय गिरीपूजे यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व कर्मचारी, शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.