अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा कार्यकारणीची सभा संपन्न…

 

युवराज डोंगरे/खल्लार 

उपसंपादक

        नुकतीच अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ अमरावती जिल्हा कार्यकारणीची सभा संपन्न झाली. जुन्या पेंशन करिता अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ तर्फे दिनांक 5 ऑक्टोबर ला दिल्लीला मोठ्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याकरिता देशातील वेगवेगळ्या चार राज्यातून पेंशन यात्रा काढण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी एक यात्रा आपल्या अमरावती जिल्ह्यात 30 सप्टेंबर ला येत असून पुढे मध्यप्रदेश मार्गे दिल्लीला जात आहे.

         त्या यात्रेचे स्वागत करणे, यात्रेतील नेतृत्वाचे मार्गदर्शनात सभा घेणे व यात्रेला निरोप देणे या प्रमुख आणि इतर संघटनात्मक बाबी करिता सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेमध्ये खालील महत्वपूर्ण ठराव संमत करण्यात आले. किरण पाटील जनरल कौंशिल सदस्य यांची राष्ट्रीय आंदोलन त्रिसदस्यीय समितीमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन चा ठराव संमत करण्यात आला. नुकत्याच आटोपलेल्या दर्यापूर शिक्षक पतसंस्थेत समता पॅनल ला बहुमत प्राप्त करून दिल्याबद्दल अखिल दर्यापूर शाखा सर्व पदाधिकाऱ्यांचा अभिनंदन चा ठराव मंजूर करण्यात आला. तीन वर्ष पेक्षा जास्तकार्यकाल झालेल्या तालुका कार्यकारणी पूनर्गठीत करणेबाबत चर्चा करण्यात आली.

       या सभेच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक जिल्हा संघाचे नेते व राज्य उपाध्यक्ष किरण पाटील हे होते आणि सुभाष सहारे सरचिटणीस, महिला आघाडीच्या प्रमुख सुनीता पाटील, समन्वयक वृषाली देशमुख, संजय साखरे, प्रमोद घाटोळ, संजय वाटाणे, सतीश वाणखडे, दिगंबर जामनिक, संजय नागे, मनोज चोरपागार. आदी मान्यवर मंचकावर उपस्थित होते.  

        जिल्हा संघाचे नेते व राज्य उपाध्यक्ष किरण पाटील यांनी जुनी पेशंन योजना संघर्ष यात्रेबाबत सविस्तर माहिती दिली. या सभेचे सूत्रसंचालन सुभाष सहारे यांनी केले तर आभार प्रदर्शन सूरज मंडे यांनी पार पाडले.

         या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता प्राजक्ता चीमोटे, प्रविण खरबडे, अण्णा कडू, प्रमोद दखने, जितेंद्र यावले, गजानन सहारे, भूषण ठाकूर, राजेंद्र सावरकर, सुनील बागडे, गणेश टिपरे, प्रशांत ठाकरे, प्रशांत भगेवार, गणेश जोशी, गजानन निचित, ओंकार राऊत, प्रविण शेंदरे, महेंद्र गैलवार, उज्वल पंचवटे, सुधीर भोळे, यांचे सह जिल्हा संघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, तालुका अध्यक्ष, सरचिटणीस, महिला आघाडी तालुकाध्यक्ष व सरचिटणीस आणि अखिल परिवारातील बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.