महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखुची अवैधरित्या वाहतुक करणा-यांवर  पोलीसांची मोठी कारवाई… — अवैध दारु विक्री व सुगंधीत तंबाखू विक्री संबंधाने,”दखल न्यूज भारत द्वारा,बातम्यांच्या माध्यमातून प्रशासनास दिली होती जनहितार्थ सुरक्षेची माहिती… — विशेष परिणाम…

 

ऋषी सहारे

संपादक

        अगामी गणेशोत्सवाच्या अनुशंगाने पोलीस अधिक्षक नीलोत्पल गडचिरोली यांनी संपूर्ण जिल्ह्यातील पो.स्टे. / उप पो. स्टे / पोमके यांना महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखुची अवैधरित्या वाहतुक करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

          त्या निर्देशानुसार दिनांक ११/०९/२०२३ रोजी अवैधरित्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखुची वाहतुक होणार आहे अशी खबर पो.शि. ४५३८ ढोके पो.स्टे देसाईगंज यांना मिळाल्याने पोलीस निरीक्षक रासकर पोलीस स्टेशन देसाईगंज यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर,पोलीस अंमलदार राऊत,ढोके,सराटे,कुमोटी यांनी सापळा रचून इसम नामे १) आशिष अशोक मुळे वय – ३० वर्षे रा. खरबी, पोस्ट- खेड ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर २) अतुल देविदास सिंधी मेश्राम वय – २९ वर्षे रा. ‘भवानी वार्ड, ब्रम्हपुरी ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर यांस पकडले.

           त्याचे ताब्यातून १) लाल रंगाची टाटा कंपनीची आयशर वाहन क्र. एम एच ४० सी.एम. ६५५२ कि.अं १० लाख रुपये,२) २४ नग मोठ्या पांढ-या रंगाचे प्लॅस्टीकच्या चुंगळीमध्ये प्रत्येकी ६ नग पांढ-या रंगाचे कट्टे व त्या प्रत्येक कट्ट्यामध्ये ११ नग पॅकेट व त्यावर इंगल हुक्का fशाशा तंबाखु असे लिहीलेल्या प्रत्येक पॅकेटची किंमत ६४० रु. असे एकुण १० लाख १३ हजार ७६० रुपये,३) २१ नग मोठ्या हिरव्या रंगाचे प्लॅस्टीकच्या चुंगळीमध्ये प्रत्येकी ४ नग पांढ-या रंगाचे कट्टे व प्रत्येक कट्ट्यामध्ये ४४ नग पॅकेट त्यावर ईगल हुक्का fशाशा तंबाखु असे लिहीलेल्या प्रत्येक पॅकेटची किंमत ३१०० रु. असे एकुण ११ लाख ४५ हजार ७६० रुपये ४) १४ नग लहान पांढ-या रंगाचे प्लॅस्टीकच्या चुंगळीमध्ये प्रत्येक कट्ट्यामध्ये ४४ नग पॅकेट व त्यावर व त्यावर ईगल हक्का fशाशा तंबाखु असे लिहीलेल्या प्रत्येक पॅकेटची किंमत ३१० रु. असे एकुण १ लाख ९० हजार ९६० रुपये असा माल जप्त केला.

             सर्व प्रकारच्या सुगंधित तंबाखू मालासह मिनी ट्रक जप्त केल्यामुळे असा एकूण ३३ लाख ५० हजार ४८० रु.किंमतीचा माल जप्त करून सदर बाबत अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन गडचिरोली यांना माहिती दिली असून त्यांचे फिर्यादीवरून पुढील कारवाई करित आहेत.

            पोलीस अधीक्षक निलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)कुमार चिंता,अपर पोलीस अधीक्षक (अभियान)अनुज तारे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांचे मार्गदर्शनात पोस्टे देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या नेतृत्वाखाली पो.उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर,पोलीस अंमलदार दिनेश राऊत,नरेश कुमोटी,विलेश ढोके व संतोष सराटे यांनी सदर घटने संबंधाने कारवाई केली आहे.