नागनाथ काशीद यांच्या परिवाराच्या वतीने किर्तन रुपी सेवाने सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात संपन्न.

 

निरा नरसिंहपुर दिनांक: 11

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार ,

पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे प्रत्येक वर्षी सालाबाद प्रमाणे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात येत आसते

         नागनाथ मारुती काशीद महाराज यांच्या परिवाराच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त ह.भ.प रामभाऊ शेळके महाराज यांची कीर्तन सेवा घेण्यात आली. तर सदर परिसरातील नरसिंहपूर, पिंपरी बुद्रुक,गिरवी, गोंदी, वकीलवस्ती, टनु ओझरे,गणेशवाडी, या संपूर्ण भागतील भाविक भक्त व ग्रामस्थ वारकरी टाळकरी विणेकरी मृदंग वादक, सह आणि भाविक भक्त व ग्रामस्थ मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते. 

           सेना महाराज पुण्यतिथी निमित्त परिसरातून आलेल्या सर्व भाविकांसाठी महा भोजन सेवा ही नागनाथ मारुती काशीद यांच्या वतीने देण्यात आली. सर्व भाविकांनी भोजनाचा लाभ घेतला.