चिचाड पाथरी येथील शांतीवन बुद्ध विहारात शीतल नागदेवे कला सेवा पुरस्काराने सन्मानित…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

        शिवतीर्थ मानव कल्याण बहुउद्देशीय संस्था खराशी तर्फे पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या सत्कार करण्यात आला.

        त्यामध्ये साकोली येथील शीतल अतूल नागदेवे यांना कला क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल कला सेवा पुरस्कार देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला.

          याप्रसंगी डॉक्टर काहालकर संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभुळकर,आयोजक पत्रकार संजीव भांबोरे, माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्ण, सदानंद धारगावे,नाशिक चौरे, तुळशीराम गेडाम इंजिनियर रुपचंद रामटेके व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

          त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल  डी जी रंगारी, तनुजा नागदेवे, जगदिश रंगारी, यादोराव गणवीर, रेखा रामटेके, प्राशिक मोटघरे, त्रिवेणी मेश्राम व इतर कार्यकर्त्यानी अभिनंदन केले.