एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्स मध्ये विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव व सोनपापडी वाटप करून केले स्वागत…

युवराज डोंगरे 

  उपसंपादक

स्थानिक दर्यापूर येथील एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्समध्ये वर्ग सहावी ते दहावी हे वर्ग सुरू झाले आहेत. काल विद्यार्थ्यांचे शाळेच्या परिसरात औक्षवान करून जंगी स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर त्यांना खाऊ म्हणून सोनपापडीचे वाटप या निमित्ताने करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो.

          गेल्या दीड दोन महिन्यापासून शाळेपासून लांब गेलेले विद्यार्थी हे काल शाळा सुरू होताच एकत्र आले. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी प्राचार्य लिझेश रामकृष्णन सर यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक माहिती विशद केली. शाळेचे नवनियुक्त प्राचार्य यांनी आपला कला गुण दर्शवत विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासूनच हसत खेळत ठेवले आहे.

         शाळेच्या पहिल्या दिवशी सुरुवातीला शालेय प्रार्थना सरस्वती मूर्ती पूजन भाषणे हे देण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनवर स्वागता निमित्त फुलांचा वर्षाव करण्यात आला व सोनपापडी त्यांना खाऊ म्हणून वाटप करण्यात आली.पहिल्याच दिवसापासून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयीची रुची निर्माण झाली असून संपूर्ण वर्षभरात शाळेचे कर्तव्यदक्ष प्राचार्य हे विद्यार्थी कृतीयुक्त शिक्षणात सहभागी करतील असे त्यांनी यावेळी विषद केले.

            विद्यार्थी स्वागताकरिता शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली तर प्राचार्य लिझेश रामकृष्णन सर यांच्या नेतृत्व मार्गदर्शनात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. सदर स्तुत्य उपक्रमाचे शालेय व्यवस्थापक मंडळांनी कौतुक केले.