खल्लार परिसरात अजित १५५ बियाण्याची दुप्पट भावाने विक्री,’त्या’विक्रेत्यांवर कृषि विभागाने कारवाई करणे गरजेचे…

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

           परिसरात शेतकरी वर्गाकडून पेरणीपूर्व तयारी सुरू आहे.येत्या काही दिवसात पावसाचे आगमन होणार असल्याचे हवामान खात्याकडून वर्तनविण्यात आले असून शेती साठी लागणारे बी बियाणे व इतर साहित्याची खल्लार परिसरातील शेतकरी तर कृषी केंद्र संचालकांनी आपापल्या दुकानात बि बियाणे विक्रीसाठी आणले आहे.

           खल्लार परिसरात अजित १५५ या बियाण्याची काही विक्रेते हे दुप्पट भावाने विक्री करीत आहेत.अजित १५५ या बियाण्याची किंमत ८६४ रुपये आहे विक्रेत्यांनी तेवढ्याच भावात शेतकऱ्यांना विकायला पाहिजे परंतु ८६४ रुपये किंमत असलेली बॅग  १४०० ते १५०० रुपये किंमतीला शेतकऱ्यांना विकत आहेत. याकडे कृषि विभागाने लक्ष देऊन विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची होत असलेली लुबाडणूक थांबविणे गरजेचे आहे.

बॉक्स

             जे विक्रेते शेतकऱ्यांना दुप्पट भावाने अजित १५५ ची विक्री करीत आहेत त्यांना पावती दिल्या जात नाही तसेच त्यांच्याकडे अजित १५५ बियाणे विक्रीस आहे याबाबत रजिस्टर वर नोंदही नाही मग ‘त्या’विक्रेत्यांकडे अजित १५५ बियाणे आले कुठून हा प्रश्न निर्माण होतो.

बोगस बियाणेही विक्रीस

           जे शेतकरी अजित १५५ ची मागणी विक्रेत्यांकडे करतात त्यांना दुप्पट भावाने बियाणे विकल्या जाते पण काही विक्रेते त्या सोबत अजित १५५ या जातीचे बियाण्याचे बोगस बियाणेही देतात. याकडेही कृषि विभागाने लक्ष देऊन शेतकऱ्यांची होणारी फसगत थांबवावी.