सामाजिक कार्यकर्ते आतीश शिरभाते यांनी विविध वृत्तपत्रातून केलेल्या मागणीला यश… — नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दखल घेत तुडुंब अवस्थेत असलेल्या नाल्या केल्या साफ…

युवराज डोंगरे

उपसंपादक

खल्लार :- सामाजिक कार्यकर्ते अतिश बबनराव शिरभाते यांनी काल नगरपालिकेला पावसाळ्या अगोदर नाल्यांची साफसफाई करण्याची सूचना विविध वृत्तपत्रात केली होती वास्तविकतेवर आधारित केलेले वृत्तांकन हे खरे ठरले नगरपरिषद दर्यापूर मधील कर्मचाऱ्यांनी आतिष शिरभाते यांना प्राथमिक स्वरूपाची माहिती विचारून त्या ठिकाणी प्रत्यक्ष पालिका कर्मचारी व खुद्द आतिष शिरभाते यांनी बनोसा, बाभळी ,व इतर प्रभागात जाऊन तुडुंब अवस्थेत असलेल्या नाल्यांची पाहणी केली पालिका कर्मचाऱ्यांनी कुठलीही हयगय न करता आज पालिका कर्मचाऱ्यांचा फौजफाटा सफाई करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आला त्यामुळे नागरिकांना व व्यावसायिकांना होणारा पावसाळ्यातील संभाव्य धोका आता काही अंशी कमी झालेला आहे तरी पालिका प्रशासनाने अशाच प्रकारचे सहकार्य करून होणाऱ्या नाल्यांच्या त्रासाला पूर्णविराम द्यावा त्याचबरोबर शहरातील इतरही भागात नाली संदर्भातील तक्रारी यांची माहिती वृत्तपत्रात वेळोवेळी प्रकाशित केली जाईल असे सामाजिक कार्यकर्ते आतिश शिरभाते यांच्यावतीने व्यक्त करण्यात आले या मागणीला यश मिळाले असून नागरिकांनी आतिष शिरभाते यांचे आभार व्यक्त केले.