अहेरी पत्रकार संघटना द्वारा तहसिलदार मार्फत मूख्यमंत्र्याना निवेदन सादर..      

रमेश बामणकर 

अहेरी तालुका प्रतिनिधि 

अहेरी :- माध्यमाकडे लोकशाहीच्या चौथा स्तंभ म्हणून पाहिले जाते मात्र माध्यमकर्मीच्या प्रश्नांच्या सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत त्यामुळे व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून खालील मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता अहेरी तालूका पत्रकार संघटनेच्यावतीने तहसिलदार यांच्या मार्फत मूख्यमंत्री म. रा. यांना खालील विषयांवर निवेदन देण्यात आले .यामध्ये पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याला भरीव निधी यावा. पत्रकारितेत पाच वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी. वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा. पत्रकारांच्या घरासाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा. कोरोना मध्ये जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मक्त पत्रकारांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे. शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे लघु दैनिकांनाही माध्यम( ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात यावात साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात. ह्या प्रमूख मागण्या चे सामाविष्ट करण्यात आलेले आहेत. निवेदन देते वेळी . अहेरी तालुका पत्रकार कार्यकारणीचे ऋषी सुखदेव, आनंद दहागावकर, अखिल कोलपाकवार , मिलिंद खोंड, जावेद अली अनिल गुरूनूले, अशोक पागे, प्रकाश दुर्गे, आशिष सूनतकर, रत्नम , मधूकर सडमेक हे उपस्थित होते.