व्हाईस ऑफ मीडिया चिमूर तालुका यांच्या धरणे आंदोलनाला युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांनी दिली भेट.. — विविध मागण्यास समर्थन …!

 

प्रमोद राऊत / तालुका प्रतिनिधी 

 

          व्हाईस ऑफ मीडिया चिमूर तालुका यांचे चिमूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनाला चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा काँग्रेस नेते दिवाकरभाऊ निकुरे यांनी भेट देऊन आपले समर्थन जाहीर केले.

     यावेळेस दिवाकर निकुरे त्यांच्या सोबत माजी जि. प. सदस्य गजानन बुटके, जिल्हा युवक काँग्रेस महासचिव गौतम पाटील, युवा काँग्रेस कार्यकर्ते जावाभाई शेख उपस्थित होते.

             यावेळी व्हाईस ऑफ मिडीयाचे डिजिटल विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश डांगे, जिल्हा सदस्य विलास कोराम, जिल्हा सरचिटणीस बालु सातपुते, जिल्हा सदस्य प्रमोद राऊत, चिमूर तालुका अध्यक्ष रामदास हेमके, तालुका सचिव भरत बंडे, योगेश सहारे, उमेश शंभरकर, फिरोज पठाण, जावेद पठाण, सुनील हिंगणकर इम्रान कुरेशी आदी उपस्थित होते.