दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : केळगाव येथील भारतीय खेळ प्राधिकरण अंतर्गत जोग महाराज व्यायामशाळेस केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी जोग स्पोर्टस अकॅडेमीला भेट देऊन महिला कुस्तीगीरांशी संवाद साधला. व्यायाम शाळेच्या प्रगतीबाबत कौतुक केले तसेच व्यायामशाळेच्या अडचणी संदर्भात चौकशी करून त्या पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी खडसे यांनी दिले.
याप्रसंगी बाळासाहेब चौधरी, किरण मुंगसे, दिलीप मुंगसे, पांडुरंग मुंगसे, विठ्ठल भांडवलकर, सुधीर वहिले, शिवाजी मुंगसे, रवींद्र जाधव, आंतरराष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंकिता काटे, कुमार महाराष्ट्र केसरी आदर्श गुंड, हार्दिक गुंड, विशाल गुंड,विशाल थोरावे, अजित गाडे, अक्षय गावडे, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले. याप्रसंगी आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी रक्षाताई खडसे यांचे स्वागत केले.
यावेळी भाजपा आध्यात्मिक आघाडीचे संजय महाराज घुंडरे, भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, संगीता पफाळ, सुनिता रंधवे, आकाश जोशी, ज्ञानेश्वर बनसोडे तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



