Home Maharashtra सुमेध बुद्ध विहार एकोडी येथे महात्मा फुले जयंती साजरी…

सुमेध बुद्ध विहार एकोडी येथे महात्मा फुले जयंती साजरी…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : सुमेध बुद्ध विहार एकोडी येथे महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली.सुरुवातीला महाकारूनिक तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतीबा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमे समोर दिप प्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले.

         त्याप्रसंगी एकोडी येथील सरपंच संजय खोब्रागडे, स्टेट बँक इंडिया एकोडीचे मॅनेजर विकास गजभिये, ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, सुकराम बन्सोड, वैभव खोब्रागडे, पोलीस चौकी इंचार्ज नवनीत जांभुळकर, मनोज कोटांगले, कैलास जांभुळकर, कार्तिक मेश्राम,शेषराज मेश्राम, अमित भैसारे,मंगेश जांभूळकर, मोहिनी कोटांगले, शालू कोटांगले, सुरेखा मेश्राम, तनवी कोटांगले, संकल्प कोटांगले, आरुष कोटांगले उपस्थित होते.