भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
धानोरा तालुक्यातील कान्हाळगाव येथील ग्रामपंचायत सभागृहात महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायतचे सरपंच सौ मंगला चंदू बोगा होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच संजय पदा अंगणवाडी सेविका प्रमिला पदा ग्रामपंचायत सचिव यु एस शंभरकर हे उपस्थित होते.
सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी महात्मा फुलेंचे कार्य प्रेरणादायी आहेत.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत कर्मचारी नामदेव चंदू गावडे संगणक परिचालक सुनील देवाजी गावडे तेजस्विनी अंबादे महेश आत्राम उद्धव खेवले व इतर गावकरी उपस्थित होते.



