प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त पुणे येथील फुलेवाड्यात आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर हे अभिवादन करण्यासाठी सपत्नीक गेले होते.
त्यांनी मिडियाच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधताना म्हटले की,महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर आधारित असलेल्या फिल्मला सेंसार बोर्डांनी मान्यता द्यावी,त्यांनी मान्यता दिली नाही तर सेन्सर बोर्ड सदस्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल असे सांगितले.
मनुवादी संस्कृतीला अनुसरून तात्कालीन रूढी परंपरा भारत देशातील बहुजन समाजावर आणि समस्त स्त्री वर्गांवर अन्याय-अत्याचार करणाऱ्या होत्या,त्यांचे शोषण करणाऱ्या होत्या,त्यांना पशु तुल्य जिवन जगण्यास भाग पाडणाऱ्या होत्या,त्यांचे सर्व अधिकार नाकारणाऱ्या होत्या आणि शिक्षणाचे दरवाजे बंद करुन ठेवणाऱ्या होत्या.
याचबरोबर जातीभेदाच्या व्यवस्थेला अनुसरून भारतीय स्त्रिपुरुषांना गुलाम बनवून ठेवणाऱ्या ब्राह्मण मान्यतेच्या धार्मिक परंपरा व कायदे होते.
ब्राह्मणी वर्णव्यवस्थामुळेच या देशात विषमतेचा स्तोम माजला होता आणि विषमतातंर्गत प्रखर जातीभेदी मानसिकता अन्वये भारत देशातील शुद्र-अतिशुद्रांच्या बंधुत्वाला अजिबात महत्व नव्हतं,मान्यता नव्हती,अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह तात्कालीन शुद्र-अतिशुद्र म्हणजे आताचे ओबीसी,एससी,एसटी,एनटी,व्हिजेंटी चे संपुर्ण स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले होते,या समाजासाठी न्याय तर दुरापास्त झाला होता.
अशा विपरीत तथा गंभीर अन्याय-अत्याचारग्रस्त परिस्थितीत सुध्दा सुधारणा घडवून आणण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी,”सामाजिक क्रांती बरोबरच शैक्षणिक क्रांती घडवून आणण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सोबत,”मनुवादी संस्कृतीला व ब्राह्मण मान्यता परंपरेला,हादरे देण्याचे महान कार्य केले.
अनेक रुढी परंपरा नाकारत भारत देशातील समस्त स्त्रियांना आणि इथल्या मुळ निवासी बहुजन समाजाला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सर्व स्तरावर कार्य केले.
या कार्यातंर्गत शोषणकारी रुढी परंपरेला आणि धार्मिक विषमतेला हादरे देत महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक क्रांती आणि शैक्षणिक क्रांती केली व समस्त समाज व्यवस्थेत बदल घडवून आणले.
देशातील समस्त माणसांना मानुसपण समजावून सांगितले,मानुष्कितील न्यायाला धार दिली.समता रुजविण्यासाठी प्रत्यक्ष कृती केली,म्हणूनच भारत देशात धार्मिक व सामाजिक बदलाबरोबर न्यायीक बदल घडून आले हे नाकारता येत नाही.
म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या देशातील मुळ बहुजन समाजातील नागरिकांचा श्वासच आहेत.
यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फिल्मला मान्यता न देण्या मागचे मुख्य कारणच मनुवाद-ब्राह्मणवाद आहे.यापलिकडे दुसरे कुठलेही कारण नाही…
या देशातील बहुसंख्य बहुजन समाजातील नागरिकांवर परत एकदा ब्राह्मणवाद आणि मनुवाद कायम लादण्यासाठी किंवा थोपविण्यासाठी भाजपा,आर.एस.एस.आणि त्यांच्या अखत्यारीत असलेल्या आणि उच्चवर्णीय विचारांचे जतन करणाऱ्या सर्व उच्चवर्णीय हिंदू संघटना,पुरेपूर प्रयत्न करीत आहेत.
म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यांवर व विचारांवर आधारित असलेल्या पिचरला कसे काय ब्राह्मण आणि मनुवादी सेंसार बोर्ड मान्यता देणार?
सेंसार बोर्डच जातीवादाने आणि धर्मवादाने प्रेरीत असेल तर त्यांच्या छाताडावर बसून महात्मा ज्योतिबा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राजश्री छत्रपती शाहू महाराज,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखी जगविख्यात लोकहितार्थ/लोकसंरक्षणार्थ क्रांती करण्यासाठी या देशातील नागरिकांनी परत सर्व दुरवरचा विचार करून आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावेच लागले अशी मानसिकता तयार करुन ठेवायला हवी….
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर म्हणाले सेंसार बोर्ड हे सरकारच्या धोरणानुसार कार्य करतय.केंद्र आणि राज्य सरकारचे काय वैचारिक धोरण आहे हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील फिल्म मंजुरीवरुन प्रामुख्याने लक्षात येईल….



