आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत धान्य खरेदी केलेल्या धान्याची उचल होत नसल्याने धान्याची नासाडी तर करोडो रुपये जाणार व्यर्त….

ऋषी सहारे

     संपादक

गडचिरोली- जिल्हयात दरवर्षी कोट्यावधी धान पावसाळ्यात भिजून सडत असते व नुकनास झाल्याची ओरड असते. आदिवासी विकास महामंडळातर्फे जिल्ह्यातील अनेक केंद्रात धान खरेदी केला जातो. परंतू धान साठवणीसाठी गोदामाची कमतरता असल्यामुळे बऱ्याच धान खरेदी केंद्रावर उघड्यावरच धान आहेत. असे चित्र अनेक धान खरेदी केंद्रावर पाहवायास मिळतो.

           जिल्ह्यातील कुरंडीमाल, रामगड, कुरखेडा, कारवाफा, मुरुमगाव, पोटेगाव, रेगडी आदि ठिकाणी धान उघडयावर पडून आहेत. शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळाले परंतू अजुनही धानाची उचल करण्यात आलेली नाही. अपूरे गोडावून अभावी ‘ कोट्यावधी धान उघड्यावर पडून आहेत. काही ठिकाणी फाटक्या ताडपत्रीने धान झाकले आहेत. नैसनिक पाऊस आला तर धानाची अथोनाथ नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. मागील वर्षी कुरंडीमाल ‘ मुरुमगाव, रांगी, चांदाळा अश्या विविध ठिकाणचे धान पावसाने सडले होते.

            त्यामुळे शासनाला कोट्यावधी रुपयाचा फटका सहन करावा लागतो. प्रशासनांने वेळीच योग्य दखल घेतली पाहिजे परंतु तसे होताना दिसत नाही. अनेकदा मिलर्स कडून धानाची उचल केल्या जात नाही. मागील वर्षी आष्टी, पावीमुराडा येथील केंद्रातील धान उचल न करताच कागदोपत्री उचल दाखवून मोठया प्रमाणात भ्रष्टाचार केला गेला याची चौकशी सुरु असल्याचे कळते ‘सन २०१६-१७ मधे धान खरेदीत व मिलर्स च्या दिरंगाईमुळे कोट्यावधीचा भ्रष्टाचार उघड झाला होता.

              यात अनेक मोठे अधिकार व व्यवस्थापकांना जेल ची हवा खायला मिळाली होती. तर बऱ्याच मालकांना नोटिस बजावण्यात आले होते तरी यापुढे असे होऊ नये म्हणून धानाची तत्काळ उचल करावी अशी मागणी होत आहे.