Home Social चंद्रपूर जिल्ह्यात लोक प्रतिनिधी आहेत काय? सरकार नावाची यंत्रणा कुठे आहे? ...

चंद्रपूर जिल्ह्यात लोक प्रतिनिधी आहेत काय? सरकार नावाची यंत्रणा कुठे आहे? — प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांचा संतप्त सवाल…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

      चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावांसह शहरात अनेक समस्या उद्भवल्या असून शासकीय यंत्रणा अंतर्गत कोणतीही मदत वेळेवर मिळत नाही. 

        चंद्रपूर जिल्ह्यात विद्युतचा व रस्त्यांचा गंभीर प्रश्न असून या प्रश्नाकडे कोणत्याही राजकीय लोकप्रतिनिधीला लक्ष द्यायला वेळ नसल्याने या जिल्ह्यात लोकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी कुणी आहेत की नाही? असा प्रश्न प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांनी उपस्थित केला आहे.

          चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी चांगला मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नदी व नाल्या काठच्या,तसेच शेतात विहीर असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत पिके लावली.

         परंतु नदी,नाले व विहिरीत भरपूर पाणी असतांनाही विद्युतच्या होल्टेज अभावी शेतातील पिके करपू लागली आहेत.चिमूर तालुक्यातील अनेक भागात गेल्या अनेक दिवसापासून विद्युत होल्टेज कमी जास्त प्रमाणात होत असल्यामुळे कृषी पंप जळू चांगली आहेत.

       त्यामुळे शेतकरी संकटात सापडले असून त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड पडतो आहे.तर अनेक ठिकाणच्या इलेक्ट्रीक डिपी जळालेल्या आहे. 

      अनेक ठिकाणी विद्युत प्रवाह जोडण्यात आला असला तरी होल्टेज राहत नाही.तर काही दिवस विद्युत प्रवाहाचा दर पाच-पाच मिनिटांनी लपनडाव सुरु असते. 

      शेतकऱ्यांनी शेतात लावलेली पिके विद्युत अभावी,पाणी देता येत नसल्याने ती करपू लागलेली आहे.यामुळे शेतकऱ्यांनी आपले जीवन कसे जगावे?असा गंभीर प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यांतील 

 शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.

         चंद्रपूर जिल्ह्यात रस्त्यांची अतिशय गंभीर आणि बिकट परिस्थिती झालेली आहे.काही भागात आरोग्याच्या सोयी अपूर्ण असून आरोग्य केंद्रामध्ये औषधीचा तुटवडा आहे.वेळेवर रुग्णांना औषधी मिळत नाही.

       घरकुलाचे हप्ते सहा सहा महिन्यापासून थकलेले आहे.यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य फक्त दोन -चार हजार रुपये मिळाली आहे.सरकार यांनी जाहीर केल्या प्रमाणे मदत मिळाली नाही.

       जनतेच्या प्रश्नाकडे सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही.यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात कोणी वाली आहे की नाही,अशा कडक शब्दात प्रहार पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

          चंद्रपूर जिल्ह्यात समस्या,अडचणी सोडविण्यासाठी कोणताही सत्ताधारी लोकप्रतिनिधी पुढाकार घेतांना दिसत नसल्याने या जिल्ह्यात कोणी राजकीय मायबाप आहे की नाही? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांनी दिली आहे.