डॉ.बाबासाहेब आंबेडकर जगासाठी प्रेरणादायी समतेचे विद्यापीठ आहेत. :- समतादूत प्रज्ञा राजुरवाडे.. — जांभुळघाट येथील महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम…

     रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

       डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ व्यक्ति नसून ते समाजीक समतेचा विचार आहेत.ज्यांचा समता,स्वांतत्र्य,न्याय आणि बंधूता या तत्वावर विस्वास आहे. अशा संपुर्ण जगासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे विद्यापीठ जिवन जगन्याचे प्राणवायू आहेत असे प्रतीपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सशोधंन व प्रशिक्षन संस्था बार्टिच्या समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी सम्राट अशोक विस्वशांती बौद्ध विहार जांभुळघाट येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त संबोधित करताना वक्तव्य केले.

           या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरीचंद्र पाटिल माजी सैनिक हे होते तर मुख्य अतिथी म्हणून दखल न्यूज भारतचे कार्यकारी संपादक दामोधर रामटेके,समाजसेवक एकनाथ गोंगले,किरण गोंगले प्रा.दीक्षान्त रामटेके,ग्रा.सदस्य निता रामटेके,संजना खोब्रागडे हे उपस्थीत होते.

         पुढे बोलताना समतादूत प्रज्ञा राजुरवाडे म्हणाल्या की महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जिवन संगर्ष हा सामाजीक समतेसाठी,पिडीत,वंचित ,दडपलेल्या सर्व समाजाच्या आत्मसन्मासाठी लोकशाहि बळकट होण्यासाठी होता.

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी विरोधी पक्षाचे अस्तितव शक्तीशाली असावे असा इशारा सविधान सभेतील शेवटच्या भाषणात देतात नितीमान समाज व्यव्यस्थेची अत्यावश्यकता बाबासाहेबाना अपेक्षित होती.

            जातीवीहिन,वर्णविहिन, बुधिवादी,समतावादी समाजाचे स्वप्न पाहणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कृतीत उतरवीने गरजेचे आहे.लोकशाही बळकट करायची असेल तर तुमचे मत वाया गेले तरी चालेल पण,येत्या निवडणुकीत आपले मते विकू नका,कूठल्याही राजकीय प्रलोभणाला बळी पडू नका,आपला खरा नेता कोन आहे हे ओळखण्याची आज गरज आहे.  

          राजकीय पक्ष छोटा असला तरी चालेल पण तो विरोधीपक्ष सक्षम वंचित समाजाचा आवाज हवा.म्हणून प्रत्येक गावातून फुले,शाहू आंबेडकरांच्या समतेचा आवाज ससंदेत पोहचला पाहिजे हीच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली होय असेही त्या म्हणाल्या.

         हआज समाजानी खुप प्रगती केली आहे.समाजाचा अनमोल दागीना बौद्ध विहारे आहेत.समाजाची सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक,राजकिय प्रगती कशी होईल?समाजाच्या विनयशीलतेची प्रतिमा कशी उंचावेल?यावर प्रत्येक बौद्ध विहारात चर्चा हवी.समाजात शिस्तबद्धता हवी,मान-सन्मान- पदे- सघटना यांची अपेक्षा बाळगू नका.

          डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात सत्य मौल्यवान सशोधन आपणास दिले आहे ते म्हणजे 22 प्रतिज्ञा होय.त्यांचे पालन करा व इतरानाही सांगा,मुलाना व मुलीना उच्च शिक्षण द्या,प्रतेक बौद्ध विहारात भारतिय संविधान वाचनाचा कृती कार्यक्रम राबवावा,आपल्या न्याय हक्काविषयी-कर्तव्याविषयी जागृती असायला हवी असे स्विस्तर मार्गदर्शन यावेळी समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी केले.

        या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धणराज खोब्रागडे यांनी केले.महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी बहूसंख्य बौद्ध उपासक व उपाशीका हजर होत्या.