खरीप पणन हंगाम २०२३-२४ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी….

ऋषी सहारे

संपादक

गडचिरोली, दि. १० : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादीत नाशिक, उप प्रादेशिक कार्यालय, अहेरी (उच्च श्रेणी) अंतर्गत शासनाच्या निर्देशानुसार खरीप पणन हंगाम २०२३ – २४ साठी दि. ०१ ऑक्टोबर २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत धान विक्री करीता शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरु झालेली असुन महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादीत नाशिक, उप प्रादेशिक कार्यालय, अहेरी ( उच्च श्रेणी) मार्फत मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या ५ तालुक्यामध्ये खरेदी केंद्र अहेरी, बोरी, कमलापुर, वेलगुर, इंदाराम, उमानुर, आलापल्ली, पेरमिली, जिमलगट्टा, देचलिपेठा, मुलचेरा, सिरोंचा, झिंगानूर, असरअल्ली, अमरादी, अंकिसा, वडधम, पेंटीपाका, जाफ्राबाद, रोमपल्ली, बामणी, विठ्ठलरावपेठा, भामरागड, लाहेरी, ताडगांव, कोठी, मन्नेराजाराम, एटापल्ली, गट्टा, तोडसा, घोटसुर, कसनसुर, जारावंडी, गेदा, हालेवारा, कोटमी व हेडरी असे एकुण ३७ खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले आहे. करीता खरीप पणन हंगाम २०२३-२४ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी.

        तसेच खरीप पणन हंगाम २०२३ २४ मध्ये धान विक्रीसाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या लगतच्या आ.वि.का.सह. संस्थाच्या खरेदी केंद्राशी संपर्क साधुन दि. ०१ ऑक्टोबर २०२३ ते दि. ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे करीता सातबारा, आधारकार्ड, नमुना ८ अ, चालु बँक पासबुक व इतर आवश्यक दस्तावेज घेऊन स्वत: हजर राहुन ऑनलाईन नोंदणी करुन शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा असे उप प्रादेशिक व्यवस्थापक, अहेरी (उच्च श्रेणी), बि.एस. बरकमकर यांनी कळविले आहे.