बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर या भागामध्ये मे महिन्यात झालेल्या बिगर मोसमी (अवकाळी) पावसाने सगळीकडेच हाहाकार माजवला.त्यामुळे शेतीची कामे ठप्प झालेली होती. पिकांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला.
आता पावसाने उघडीत दिल्याने पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये नरसिंहपूर, टणु, गिरवी, पिंपरी बुद्रुक, ओझरे, गणेशवाडी, गोंदी, लुमेवाडी, लिंबुडी, आडोबा वस्ती , शिन्दे वस्ती ,इत्यादी गावातील शेतकऱ्यांनी आप आपल्या शेतामध्ये आडसल्या ऊस लागण करणे, नांगरट करणे, ट्रॅक्टरच्या अवजाराणे फणनी करणे, रोटावेटर मारणे, पाळी घालने,ऊस बांधणी करणे,ऊस लागवड करणे,केळीची लागवड, पेरूची लागवड, डाळिंबाची लागवड, चिक्कू लागवड,अश्या इत्यादी अनेक शेतीच्या कामांना शेतकरी राजांनी सुरुवात केलेली आहे.
या वर्षीच्या कडक उन्हाळ्यानंतर पावसाळ्या पूर्वीच (आवकाळी)बिगरमोसमी पावसाचे जोरदार आगमन झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. सर्व पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले; परंतु आता पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी राजा स्वाताला सावरू लागला आहे.
त्यामुळेच शेतीच्या कामांना वेग आला आहे. उन्हाळ्यात नांगरणी करुन शेती तापायला ठेवली जाते. त्यामुळे पिके जोरदार येऊन उत्पादनात वाढ होते; परंतु यावर्षी उन्हाळ्यातच पाऊस पडल्याने जमीन तापायला वेळ मिळाला नाही. आता जमिनीत वाफसा आल्याने शेतीतील सर्व कामे वेगाने चालू आहेत.
चालू वर्षी आता उन्हाळ्यातच यावर्षी विहिरी व बोअरवेल भरल्याले आहेत. पावसाने उघडीप दिल्याने शेतीच्या कामाची लगबग चालू झाली आहे. या वर्षी बाजरी, ऊस, मका, भुईमूग व फुलशेती, भाजी पाला वाढणार आहे.



