Home कृषी शंकरपूर मंडळातील पाचगाव येथे ड्रोन द्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक…

शंकरपूर मंडळातील पाचगाव येथे ड्रोन द्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

    चिमूर तालुकांतर्गत सोयाबीन,कापूस,भात,तूर या प्रमुख पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे.या पिकाच्या कीड नियंत्रणासाठी शेतकरी चार ते पाच कीटकनाशकाच्या फवारण्या करत असतात.

      परंतु सततच्या पावसामुळे कोणत्याही प्रकारची फवारणी करणे शक्य होत नाही.वेळेवर फवारणीसाठी मजूर देखील उपलब्ध होत नाहीत.एका ठराविक कालावधीनंतर पिकाची पूर्ण वाढ झाल्यामुळे शेतात फवारणीसाठी जाता येत नाही.

       त्यामुळे कीड व रोग पिकाचे नुकसान करते.हे नुकसान टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोन द्वारे पिकावर फवारणी करता येते.

     यासाठी मौजा पाचगाव येथे कृषी विभागांतर्गत व सलाम किसान यांच्या सौजन्याने शेतकरी व महिला शेतकरी यांच्यासाठी शेतामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

      या कार्यशाळेसाठी सलाम किसानचे मार्केटिंग मॅनेजर श्री सुमित मुंगले यांनी ड्रोन फवारणी बाबत संपूर्ण मार्गदर्शन केले.

       यावेळी श्री.भास्कर फरकाडे मंडळ कृषी अधिकारी शंकरपूर,श्री.गोकुळ बनसोडे उप कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी कु.नंद, कु.पिंपळकर,कु.देशमुख,श्री.रेंगे,श्री.ठावरी,श्री.झरकर,श्री.पौळ,श्री.शनवारे,श्री.धाडवे,तसेच शंकरपूर,आजगाव,पाचगाव,जवराबोडी,खैरी,आबोली,वाकर्ला,कवडसी देशमाने,चिचाळा कुणबी,पांजरेपार,साठगाव,कोलारी,किटाळी मक्ता,हिरापूर येथील शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.