प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
भारत आणि महाराष्ट्र सरकार ने ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना अनेक योजनात गुरफटून ठेवले असले तरी या योजनांच्या माध्यमातून गरीब नागरिकांचे जिवनमान उंचावले जात नसल्याचे आणि त्यांची आर्थिक,शैक्षणिक,सामाजिक,राजकीय,व व्यवसायिक स्थिती सुधारली जात नसल्याचे अतिशय गंभीर विदारक चित्र पुढे आहे..
भारत देशांतर्गत शेतकरी,मजूर,भुमिहिन,बेरोजगार,भटकणारे नागरीक,बेघर असलेले नागरीक,भिक्षा मागणारे नागरिक,आणि परावलंबी असणारे नागरीक गरीबीच्या व्याख्यात मोडतात..
भारत देशांतर्गत मोजक्या भांडवलदारांच्या व्यवसायांना चालना देण्यासाठी त्यांना अनेकदा भारत सरकारच्या मध्यस्थीने विविध आर्थिक संस्थांमधून व बॅंकाकडून खरोबो रुपयांची कर्जे दिली गेली व ही कर्जे भारत सरकार द्वारे माफ केली गेली…
भांडवलदार व्यवसायीक हे राजकीय पक्षांना सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडणूक लढविण्यासाठी रुपये देत असल्यामुळे भारत सरकार व राज्य सरकार हे भांडवलदार व्यवसायीकांसाठी काहीही करायला तयार असते…
परंतु ज्या भांडवलदार व्यवसायीकांना भारत सरकार अनेक प्रकारचे कर्ज देण्यास मदत करतय आणि त्यांची खरोबो रुपयांची कर्जे माफ करतय तेच सात्तापक्षधारी आणि इतर पक्ष व्यवसायिक भांडवलदारांच्याकडून लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रुपये घेतात हेच तर सर्वात मोठी भ्रष्ट निती,”भारत देशातील मुळ निवासी म्हणजे बहुजन समाजातील नागरिकांना गरीब ठेवते आहे आणि त्यांना मुलभूत हक्कांपासून वंचित करते आहे,हे स्पष्ट आहे.
उदाहरणार्थ:- गरीब लोकांसाठी सरकारी जागेवरील घरांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना या नावापुरत्याच योजनांचा प्रपोगंडा करण्यासाठी असल्याचे अनुभव ग्रामीण व शहरी भागातील गरीब नागरिकांना आलेला आहे.
ग्रामीण व शहरी भागातील नागरिक आपल्या कुटुंबासह सरकारी जागेवर १२ ते ५० वर्षांपासून राहात असताना त्यांना त्या जागेचे मालकी हक्क पट्टे दिले जात नाही आणि घरकुल योजनेच्या माध्यमातून सुध्दा त्यांना त्या राहते जागेवर,”घरकुल योजना अंतर्गत घरे,शासन-प्रशासनाचे लालफितीत शाहिचे धोरणच बांधकाम करु देत नाही,येवढी मोठी उपेक्षा ग्रामीण व शहरी भागातील गरीबांची केल्या जातय…
एवढेच काय तर भांडवलदार व्यवसायीकांसाठी हजारो एकर जागा कवळीमोल भावात देणारे भारत सरकार आणि राज्य सरकार हे गरीबांच्या उपजिविकेसाठी जबरानज्योत जागेचे मालकी हक्क पट्टे संघर्ष करुनही जबरानज्योत धारकांना देत नाही याला काय म्हणावे? भारत सरकार आणि राज्य सरकार हे जबरानज्योत धारकांची आणि गरिबांची पिळवणूक करते,”ते सरकार आमचे सरकार? म्हणावे लागते हे जगाच्या पाठीवरील सर्वात मोठी शोकांतिका आहे.
भाजपच्या सत्ताकाळात सरकारी जागेवरील गोरगरिबांच्या घरांना पाडल्या जात आहे.त्यांना बेघर केले जात आहे.त्यांच्या भविष्याचा चुराडा केला जात आहे.त्यांना उघड्यावर आणून कंगाल केले जात आहे.त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम पाडल्या जात आहे.त्यांना दरदर भटकंती करण्याला मजबूर केले जात आहे,याला आपले सरकार म्हणायचे? आहे ना आपले सरकारची मजेशीर व्याख्या…
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) आणि रमाई आवास योजना यांसारख्या योजनांद्वारे,आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (EWS) आणि कमी उत्पन्न गटातील (LIG) लोकांना परवडणाऱ्या घरांसाठी अल्प आर्थिक मदत केली जाते.
या योजनेत,केंद्र सरकार शहरी गरिबांसाठी 2 कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.आर्थिक सहाय्य,गृहकर्जावरील व्याज अनुदान आणि इतर सुविधा PMAY अंतर्गत दिल्या जातात.या योजनेत,EWS/LIG कुटुंबांना स्वतःचे घर घेण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
रमाई आवास योजना ही योजना महाराष्ट्रात, विशेषतः शहरी भागातील अनुसूचित जातीतील लोकांसाठी आहे.या योजनेत,पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी किंवा घर दुरुस्त करण्यासाठी अनुदान दिले जाते.या योजनेअंतर्गत,घरकुल बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
पण वाढत्या लोकसंख्येमुळे घरबांधणीसाठी जागा उपलब्ध करून देणे हे सुद्धा भारत सरकारचे आणि महाराष्ट्र सरकारचे आद्य कर्तव्य असताना अशा पध्दतीची धोरणे कटाक्षाने दोन्ही सरकार राबवीत नाही याला त्यांची गरीबांना दाबून मारणारी निती आणि गोरगरिब नागरिकांना निवाऱ्या सारख्या मुलभूत हक्कांपासून वंचित ठेवणारी पिळवणूक कार्यपद्धत म्हणावे लागेल.
याशिवाय,इतरही अनेक राज्य आणि केंद्र पुरस्कृत योजना आहेत,ज्या गरीब लोकांसाठी घरांची सोय उपलब्ध करून देतात.
गरिबीची व्याख्या काय आहे?
गरिबी म्हणजे अन्न,वस्त्र आणि निवारा यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा पैसा नसणे होय.
दारिद्र्याचे प्रकार….
दारिद्र्याचे मुख्यत्वे ग्रामीण दारिद्र्य आणि शहरी दारिद्र्य, असे दोन प्रकार पडतात.
दारिद्र्य म्हणजे काय?
दारिद्र्य म्हणजे पुरेसे उत्पन्न किंवा संसाधनांच्या अभावी,व्यक्तीला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत गरजा,जसे की अन्न,वस्त्र, निवारा,आरोग्य आणि शिक्षण,पूर्ण करण्यास असमर्थ असणे.
थोडक्यात,दारिद्र्य म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत स्थिती,ज्यामुळे व्यक्ती दैनंदिन गरजा पूर्ण करू शकत नाही..
दारिद्र्याची काही प्रमुख कारणे आणि वैशिष्ट्ये….
आर्थिक कारणे…
कमी उत्पन्न,बेरोजगारी,महागाई,आणि आर्थिक संधींचा अभाव होय.
सामाजिक कारणे…
शिक्षण आणि आरोग्य सेवांची अनुपलब्धता,सामाजिक भेदभावामुळे संधींची कमतरता.
मानसिक कारणे..
नैराश्य,भविष्याची अनिश्चितता,आणि योग्य गुंतवणुकीसाठी प्रेरणा नसणे.
विकासातील अडथळे…
दारिद्र्य हे विकासातील एक मोठे आव्हान आहे,जे समाजातील काही घटकांना मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखते.
दारिद्र्यरेषा…
दारिद्र्यरेषा म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशात (उदा. देश) जगण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान उत्पन्नाची पातळी.
दारिद्र्याचे प्रकार…
सापेक्ष दारिद्र्य (इतरांच्या तुलनेत गरीब) आणि निरपेक्ष दारिद्र्य होय.(मूलभूत गरजा पूर्ण करण्यास असमर्थ).
दारिद्र्य निर्मूलनासाठी,शासनाकडून अनेक योजना राबवल्या जातात,ज्यात आर्थिक मदत,अन्न सुरक्षा,आणि आरोग्य सेवांचा समावेश असतो.
भारतातील दारिद्र्याची अनेक कारणे आहेत,ज्यात मुख्यत्वे कमी आर्थिक विकास,औद्योगिकीकरणाचा अभाव,बेरोजगारी,वाढती लोकसंख्या,आणि ग्रामीण भागातील दारिद्र्य यांचा समावेश होतो.
भारतातील दारिद्र्याची काही प्रमुख कारणे….
कमी आर्थिक विकास..
स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या आणि आताच्या काळात भारताचा आर्थिक विकास मंद असणे होय.
औद्योगिकीकरणाचा अभाव…
औद्योगिक क्षेत्रात पुरेसा रोजगार निर्माण न झाल्याने दारिद्र्य वाढले.
बेरोजगारी…
वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारीची समस्या वाढली आहे,ज्यामुळे अनेक लोक दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत.
शेतीतील कमी उत्पादकता….
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कमी असल्यामुळे आणि नैसर्गिक आपत्त्यांमुळे (उदा. दुष्काळ) उत्पादकता घटते,ज्यामुळे ग्रामीण भागात दारिद्र्य वाढते.
उत्पन्नातील विषमता….
देशात उत्पन्न आणि संपत्तीचे असमान वाटप असल्याने काही लोक गरीब राहतात.
सामाजिक आणि राजकीय कारणे….
ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांची कमतरता असल्याने लोकांचे जीवनमान सुधारत नाही.तद्वतच वाढत्या लोकसंख्येमुळे संसाधनांवर ताण येतो आणि दारिद्र्य वाढते.
सामाजिक रुढी परंपरा….
काही सामाजिक रूढी आणि परंपरांमुळे लोकांना प्रगती करण्यापासून रोखले जाते.
ग्रामीण भागातील दारिद्र्य…
ग्रामीण भागात शिक्षणाचा अभाव,अपुरी सिंचन व्यवस्था,आणि नैसर्गिक आपत्तींमुळे दारिद्र्य अधिक आहे.
शहरीकरण…
शहरी भागात चांगले जीवनमान आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातून शहराकडे लोकांचे स्थलांतर होते,ज्यामुळे शहरांमध्येही दारिद्र्य वाढते.
इतर कारणे व नैसर्गिक आपत्ती…
दुष्काळ,पूर,भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीत नुकसान होऊन लोकांचे मोठे नुकसान होते..
राजकीय अस्थिरता व भ्रष्टाचार….
राजकीय अस्थिरता आणि भ्रष्टाचार यामुळे विकासकामांमध्ये अडथळे येतात.या कारणांमुळे भारतातील दारिद्र्य कमी करण्यासाठी व्यापक स्तरावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.
राजकीय अस्थिरता आणि भ्रष्टाचारामुळे विकासकामांमध्ये अडचणी येतात.यामुळे,भारतामधील गरिबी कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करणे आवश्यक आहे
भारतातील गरिबी आणि विकास ही दोन्ही गुंतागुंतीची आणि एकमेकांशी जोडलेली समस्या आहेत.गरिबी म्हणजे अन्न,वस्त्र,निवारा,शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास असमर्थता होय.
विकास म्हणजे या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न योग्य नाही.
संदर्भ:- भारतामध्ये,गरिबी निर्मूलनासाठी अनेक योजना आणि कार्यक्रम राबवले जात आहेत,पण अजूनही मोठे आव्हान आहे.
भारतातील गरिबीची कारणे
पुरेसे रोजगार नसल्यामुळे,लोकांना गरीबीचा सामना करावा लागतो.शिक्षण आणि कौशल्यांच्या अभावामुळे चांगले काम मिळवणे कठीण झाले आहे.
याचबरोबर सामाजिक असमानतातंर्गत जातीय आणि लिंगभेदामुळे काही लोकांना संधी मिळत नाहीत,ज्यामुळे गरिबी वाढते.
तद्वतच शेतीमधील कमी उत्पादन आणि नैसर्गिक आपत्तींमुळे ग्रामीण भागात गरिबी वाढते.
देशाच्या अर्थव्यवस्थेत वाढ झाल्याने लोकांचे जीवनमान सुधारते.
पायाभूत सुविधांचा विकास म्हणजे रस्ते,वीज,पाणी यांसारख्या सुविधांमुळे विकास साधता येतो.
परंतु गरिबीमुळे विकास खुंटतो,कारण गरीब लोक चांगले शिक्षण घेऊ शकत नाहीत आणि चांगले काम करू शकत नाहीत.विकासातून गरिबी कमी करता येते,कारण चांगले शिक्षण, आरोग्य आणि रोजगारामुळे लोकांचे जीवनमान सुधारते.गरिबी आणि विकास हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत, शत्यामुळे दोन्ही समस्यांवर एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.
महिलांचे सक्षमीकरण करतांना महिलांना दर्जेदार शिक्षण देणे आणि रोजगारात समान संधी देणे आवश्यक आहे.
ग्रामीण विकास
भारताला विकसित देश बनवण्यासाठी गरिबी निर्मूलन आणि विकास दोन्ही महत्त्वाचे आहेत.सरकारने आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करून या दोन्ही समस्यांवर मात करणे आवश्यक आहे.
गरीबीचे परिणाम काय आहेत?
स्वतंत्र भारताने अनुभवलेल्या सर्वात कठीण आव्हानांपैकी एक म्हणजे दारिद्र्य आणि त्यामुळे जीवनात आणखी आव्हाने येतात.
गरिबीचे हे सर्वात मोठे आव्हान हे खराब आरोग्य आहे.गरिबीने ग्रासलेल्या लोकांना पुरेसे अन्न,योग्य कपडे,वैद्यकीय सुविधा आणि स्वच्छ वातावरण मिळत नाही.त्या व्यक्तीला दारिद्र्यामुळे खूप त्रास होतो.
गरिबी ही एक गंभीर समस्या आहे.
गरीब या शब्दासाठी मराठीत अनेक समानार्थी शब्द वापरले जातात.काही मुख्य समानार्थी शब्द खालीलप्रमाणे आहेत.ज्यात दरिद्री,कंगाल,दीन,रंक,अनाथ,निराधार,पिचलेला,आणि निष्कांचन.
या शब्दांचा वाक्यात उपयोग
दरिद्री…
“तो एक दरिद्री माणूस आहे.”
कंगाल…
“त्याचे कंगाल जीवन पाहून मला खूप वाईट वाटले.”
दीन…
“तिला दीन अवस्थेत पाहून सर्वांनाच दुःख झाले.”
रंक:
“राज्यात रंक आणि राव यांचे जीवन समान झाले आहे.”
अनाथ:
“ती अनाथ मुलांसाठी काम करते.”
निराधार:
“आजकाल अनेक निराधार लोक रस्त्यावर फिरताना दिसतात.”
पिचलेला:
“तो एक पिचलेला माणूस आहे,त्याला कोणीही मदत करत नाही.”
निष्कांचन…
“तो निष्कांचन होऊन गावोगावी फिरतोय.”
भांडवलदार व्यवसायीकांसाठी सर्व मार्ग मोकळे करणारे भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य,गरीब नागरिकांच्या हक्कांसाठी व सर्वोतोपरी विकासासाठी सर्व मार्ग मोकळे करण्यासाठी केव्हा संवेदनशील होणार हे सांगणे अवघडच!..



