जय पेरसापेन हाँयस्कूल,माळंदा येथे”शालेय मंत्रीमंडळ”गठीत….

 भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधी 

जय पेरसापेन हाँयस्कूल,माळंदा येथे दिनांक 09 जुलै रोजी लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन शालेय मंत्रिमंडळ गठीत करण्यात आले.

          मंत्रिमंडळात शाळा नायक कु.नंदिनी रामदास मडावी,उपनायक संकेत बाबूराव मातलामी सांस्कृतिक प्रमुख आदर्श अशिराम गावडे,उपप्रमुख कु.प्रत्युक्षा विनोद कोवा, क्रीडा प्रमुख सुहास रामदास पदा,उपप्रमुख कु.श्रीकर रमेश कोवा, आरोग्य प्रमुख कु.आरती चिन्नू मडावी,उपप्रमुख विशाल धनिराम गावडे, स्वच्छता प्रमुख कु.दिक्षा मनोहर गावडे,उपप्रमुख रोशन सदाशिव नरोटे,सहल प्रमुख कु.पायल तूळशिराम मातलामी,उपप्रमुख प्रज्वल मनिराम कुमोटी,पाणी पुरवठा प्रमुख सागर जिवन हलामी, उपप्रमुख कु.मेघा प्रभू हलामी,शिक्षण प्रमुख प्रिन्स संपत नरोटे,उपप्रमुख कु.दिक्षा सुधाकर उसेंडी, वर्ग प्रतिनिधी म्हणून वर्ग 8वी तील वर्ग नायक अंश बादल धुर्वे, वर्गउपनायक कु.प्रत्युक्षा विनोद कोवा वर्ग 9वी तील वर्ग नायक कु.तृप्ती शामराव उसेंडी,वर्गउपनायक दिव्यांश रविंद्र बढई,वर्ग 10वी तील वर्ग नायक रोशन सदाशिव नरोटे,वर्गउपनायक प्रज्वल मनिराम कुमोटी यांची निवड करण्यात आली.

      मतदान प्रक्रियेत तिन्ही वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एल.डब्ल्यू.धुडसे,कु.ए.बी.शेख,सि.डी.गद्देवार,एस.पि.मारकवार, जि.एन.ठमके,ए.एस.संतोषवार यांनी काम पाहिले.

        यावेळी निवडून आलेल्या मंत्रीमंडळांना शाळेचे मुख्याध्यापक ए.एन.बढई यांनी शपथ दिली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगाणाने करण्यात आली.