लोकनेते व संघर्षयात्री स्व.प्रा.मिश्रीलालजी झाडखंडे यांची द्वितीय पुण्यतिथी साजरी… 

दखल न्युज चिखलदरा

तालुका प्रतीनीधी

अबोदनगो चव्हाण

मो.न.7588228688

 

 

चिखलदरा-:काटकुंभ प्राथमिक आरोंंग्य मध्ये द्वितीय पुण्यतिथि साजरी करण्यात आली.

श्रीमती.उर्मिला मिश्रीलाल झाडखंडे चि. जयकुमार झाडखंडे श्री.रविंद्र झाडखंडे डॉ. अंकित राठोर व PHC येथिल सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत स्व.प्रा.मिश्रीलालजी झाडखंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पुजन व हार अर्पण करून प्राथमिक आरोग्य केंद्र, काटकुंभ येथिल रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.  

    स्व.गोविंद फत्तुजी झाडखंडे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, बामादेही

          संस्थेचे संस्थापक सचिव व काँग्रेस पार्टीचे नेते पार्टीचे कट्टर समर्थक स्व.प्रा.मिश्रीलालजी झाडखंडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व प्रतिमेचे पुजन करून साजरी करण्यात आली.

          लोकनेते श्री.झाडखंडे यांच्या दिव्य आत्म्यास शांती साठी 2 मिनिटासाठी मौन धारण करण्यात आले.यावेळी दोन्ही महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी वृंद व विध्यार्थी गण उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे सुत्रसंचालनाचे काम प्राचार्य श्री.कृष्णा सुरजाये सर यांनी केले व आभार प्रदर्शन प्राचार्य श्री.अमित बेलकर सर यांनी केले.

        यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.जीवनलालजी झाडखंडे उपाध्यक्ष श्री.सावण्याजी झाडखंडे सचिव श्रीमती.उर्मिला मिश्रीलाल झाडखंडे सहसचिव श्री.रविंद्र झाडखंडे श्री.सहदेव बेलकर तालुकाध्यक्ष, चिखलदरा तालुका काँग्रेस कमिटी (ग्रामीण) श्री.विक्की राठोर श्री.गुलाब हरसुले श्री.रुपलाल बिसोने श्री.सुखलाल कासदेकर श्री.जगदिश कोगे सर श्री.शाम थेलकर सर श्री.श्रीकांत झाडखंडे सर श्री.प्रकाश सुरजाये सर श्री.आकाश बेलकर सर श्री.जगदिश नागले श्री.राजेंद्र बिसोने श्री.प्रभुदास गाठे श्री.साबुलाल धिकार आदी उपस्थित होते.