जय शीतला माता मंदीर मेन रोड कांद्री येथे नऊ दिवसीय चैत्र नवरात्री उत्सव प्रारंभ…

   कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी 

          कन्हान : – चैत्र नवरात्री निमित्य जय शीतला मंदीर मेन रोड कांद्री-कन्हान येथे चैत्र नवरात्री उत्सवाची सुरूवात करण्यात आली.  

          आज मंगळवार (दि.९) एप्रिल २०२४ ला सकाळी ७ वाजता जय शीतला माता मंदीर मेन रोड कांद्री कन्हान येथे चैत्र नवरात्री प्रित्यर्थ पंडीत श्री अरविंद पांडे यांचे प्रमुख उपस्थित श्री वसंता राऊत, प्रकाश ढोके यांचे हस्ते विधीवत पूजाअर्चना अभिषेक, आरती करून प्रसाद वितरण करून नौ दिवसीय चैत्र नवरात्री उत्सवाची सुरूवात करण्यात आली.

         याप्रसंगी वामन देशमुख ,ओंमदास लाडे, नरेश रक्षक, नारनवरे काकाजी, अरुण बावनकुळे, शेखर मस्के, रामचंद्र भाऊ, गोकुल पटेल, महेश मंगतानी, प्रेमचंद चव्हाण, महादेव मुझेंवार, महेश बावनकुळे सह अनेक महिला भाविक भक्त प्रामुख्याने उपस्थित होते.

          चैत्र नवरात्री उत्सवाच्या यशस्विते करिता जय शितला माता मंदीर कमेटी मेन रोड कांद्री-कन्हानचे कमेटी प्रमुख संजय चौकसे, दिलीप मरघडे, वामन देशमुख, अशोक खैरकर, प्रकाश हटवार, बादल विश्वकर्मा, नरेंद्र ठवरे, रोशन बोरकर, प्रितेश मेश्राम, गुडडु यादव, पप्पु गुप्ता, परमेश्वर नांदुरकर सहभाविक मंडळी परिश्रम करित आहे.