ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
लालबहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथे विनोबा ऍप ओपन लिंक फाऊंडेशन पुणे व शिक्षण विभाग भंडारा यांचे सौजन्याने जिल्हास्तरीय विविध ‘नन्हे सितारे’ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
त्यातील स्वरचित कविता सादरीकरण स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव/मां येथील इ. तिसरीच्या कु.रुंजी सुधाकर संग्रामे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
त्याबद्दल तिला ‘नन्हे सितारे’ म्हणून रविंद्र सोनटक्के शिक्षणाधिकारी, राक्षे साहेब माध्य. शिक्षणाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी विनोबा ऍपचे नेहा उपासनी प्रोग्रॅम इव्हेंट मॅनेजर, डहाट सर नागपूर विभाग प्रमुख, प्राची तुमसरे भंडारा विभाग प्रमुख तसेच अनेक अधिकारी व परीक्षक मान्यवर उपस्थित होते.
याबद्दल श्री.सुधाकर संग्रामे सर यांनी मार्गदर्शन केले होते. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी भगवान वरवटे, केंद्रप्रमुख सोपान शेकडे, सरपंचा सौ.शैला डोंगरवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयपाल कुंभरे, व सदस्य, मुख्याध्यापक राजेश नंदागवळी, जांभूळकर सर, राऊत सर,ढोलणे सर तसेच अनेक अधिकारी तसेच पदाधिकारी व ग्रामवासी यांनी अभिनंदन केले.



