बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
भरतरी नाथाच्या पावन भूमीतील टणु तालुका इंदापूर येथील सुपुत्र माजी सरपंच शिवाजी (दादापाटील) विजयसिंह मोहिते पाटील यांची इंदापूर पंचायत समितीवर सदस्य पदी नियुक्ती झाल्यामुळे सर्व परिसरातून शुभेच्छा मिळत आहेत.
उपमुख्यमंत्री अजितदादांचा विचार हा केवळ आठवण नाही, तो विकासाचा मार्ग आहे. जनतेने आज त्या विचारांवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे, आशा भावनिक शब्दांत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लुमेवाडी पंचायत समिती गणातून विजयी ठरलेल्या जिल्हा परिषद सदस्या अंकिता ताई हर्षवर्धन पाटील व पंचायत समिती सदस्य शिवाजी (दादापाटील) विजयसिंह मोहिते यांच्या सहित सर्व तालुक्यातील उमेदवारांच्या विजयावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
लोकनेते कैलासवासी विजयसिंह (आप्पासाहेब) मोहिते पाटील यांचे चिरंजीव शिवाजी (दादापाटील) मोहिते पाटील यांनी लुमेवाडी गणातून विजय मिळवत. प्रतिस्पर्धी विरोधकाचा तीन हजार सहाशे चोपन मतांनी पराभव केला.
या विजयामुळे लुुमेवाडी-बावडा गटात राष्ट्रवादीचा गड अधिक मजबूत झाला आहे.
नूतन पंचायत समिती सदस्य शिवाजी (दादापाटील) मोहिते पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, यांचा आशीर्वाद पाठीशी ठेवून, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे मामा, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे, यांच्या नेतृत्वाखाली लुमेवाडी गणात सर्व भागातील अर्धवट राहिलेली विकास कामे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
तालुक्यात जनतेने नेहमीच कामाला महत्त्व दिलं आहे. कोण बोलतो यापेक्षा इंदापूर तालुक्याचा कौल पाहता पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होईल. याबाबत कोणतीही शंका नाही.
नूतन पंचायत समिती सदस्य शिवाजी (दादापाटील) मोहिते यांचे उद्गार…
तालुक्यात कोणता माणूस कामाचा व कोण काम करतो, हे मतदारांनी आज सिद्ध केले. शिवाजी (दादापाटील) मोहिते यांचा हा विजय म्हणजे दादांच्या विचारांचा, विकासाच्या बांधिलकीचा आणि जनतेच्या विश्वासाचा विजय ठरलेला आहे.
पंचायत समिती सदस्य शिवाजी (दादापाटील) यांच्या विजयानंतर , प्रतिक्रिया देताना दादापाटील म्हणाले की, जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याची परतफेड कामातूनच करेन. हा विजय माझा नसून लुमेवाडी मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि मतदाराचा आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आसते तर उमेदवारांचा झालेला विजय पहावयास दादांना मिळाला आसता.
शिवाजी (दादापाटील) मोहिते यांचे निवडी प्रसंगी उदगार.



