Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — सिंदेवाही वनपरिक्षेत्रात मांडुळ प्रजातीच्या सापांची तस्करी उघड; पाच...

ब्रेकिंग न्यूज… — सिंदेवाही वनपरिक्षेत्रात मांडुळ प्रजातीच्या सापांची तस्करी उघड; पाच आरोपी अटकेत, सात मांडुळ जप्त…

अमान कुरेशी

जिल्हा प्रतिनिधी 

दखल न्युज भारत

              ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र नवरगांव, नियतक्षेत्र रानापूर येथे दिनांक 10.02.2026 रोजी वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने मोठी कारवाई करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी कु. अंजली सावकार (बोरावार) यांच्या नेतृत्वाखाली गस्त सुरू असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई राबविण्यात आली.

          वनकर्मचाऱ्यांनी चौकशी व तपासणी केली असता रत्नापूर येथील श्री. हिवराज शामराव गहाणे यांच्या घरातून प्लास्टिक पिशवीत अनुसूची–I मधील संरक्षित मांडुळ प्रजातीचे सात साप आढळून आले. याप्रकरणी

1. अशोक धोडुजी आत्राम (वय 50, रा. रत्नापूर, ता. सिंदेवाही),

2. ईश्वर दुर्याधन शेडे (वय 53, रा. धामनगाव चक, ता. नागभिड),

3. निर्मल अनिल हालदार (वय 60, रा. नेताजीनगर, ता. चामोर्शी),

4. सरोज शिबु माली (वय 38, रा. सुंदरनगर, ता. मुलचेरा)

5. अनिल गोविंदा मेश्राम (वय 39, रा. रत्नापूर, ता. सिंदेवाही)

            यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 09112/227794 दिनांक 10.02.2026 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींना मा. प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकारी, सिंदेवाही यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

          ही संपूर्ण कारवाई श्री. कुमारस्वामी एस.आर., उपवनसंरक्षक, ब्रम्हपुरी वनविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री. अरविंद जे., सहायक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) आणि श्री. एम. बी. गायकवाड, सहायक वनसंरक्षक (तेंदू) यांच्या सहकार्याने पार पडली. कारवाईत क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक, RRU टीम सिंदेवाही, परीविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी व वाहनचालकांनी मोलाचे योगदान दिले.

            वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात पुढील कठोर कारवाई होणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.