Home Social स्मार्ट ग्राम माहुली (धांडे) ग्रामपंचायतच्या वतीने दर्यापूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान, माहूली (धांडे)...

स्मार्ट ग्राम माहुली (धांडे) ग्रामपंचायतच्या वतीने दर्यापूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान, माहूली (धांडे) ग्रामपंचायतचा सामाजिक उपक्रम…

युवराज डोंगरे 

   उपसंपादक 

खल्लार :- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. दर्यापूर तालुक्यातील माहूली (धांडे)ग्रामपंचायतच्या वतीने पत्रकारांचा गौरव व्हावा या उद्देशाने सामाजिक उपक्रम राबवून तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान व गौरव सोहळा स्मार्ट ग्राम ग्रामपंचायत आयोजित करण्यात आला होता. 

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ उषाताई गवई होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच व कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक सतिश पाटील साखरे यांच्या प्रमुख उपस्थित होते.

         कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन तथा पुष्पहार करुन करण्यात आली. उपसरपंच सतिश पाटील साखरे यांनी ग्रामपंचायत च्या सेवाकार्याचा विकासात्मक कार्याचा आढावा पत्रकारांसमोर मांडला. तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान देऊन गौरविण्यात आले.

        यात शशांक देशपांडे, गजानन देशमुख, हरीदास खडे,धनंजय धांडे, अमोल कंटाळे, सचिन मानकर, गजानन चौरपगार,शुभम घाटे, नवेद भाई, युवराज डोंगरे, शिलवंत रायबोले, आदेश खांडेकर, रवि नवलकार, गणेश साखरे यांना सन्मानित करण्यात आले.

          यावेळी ग्रामपंचायत सदस्य अरुण धांडे, निलेश कातखेडे प्रतिष्टीत नागरिक राजू भाऊ मोहोड,गंगाजी ठाकरें,संतोष साखरे, ग्रामपंचायत कर्मचारी, मयूर मोहोड, कमलेश सोनोने,चेतन गवई, मिथुन आठवले, यांच्यासह गावकरी उपस्थित होते.