प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
महाराष्ट्र राज्यात २९ महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणूकांची रणधुमाळी जोरदार सुरू आहे.अनेक पक्षांच्या प्रमुखांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जिंकण्याचे दावे-प्रतिदावे निवडणूक पुर्व केले आहेत.
मात्र,बहुजन समाज पार्टी व वंचित बहुजन आघाडीच्या पक्षप्रमुखांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकाच्या निवडणूकांपुर्व नगरसेवक निवडून येणारे दावे केले नाही.
परंतु आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी बहुजन समाज पार्टी व वंचित बहुजन आघाडीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत व त्यांच पध्दतीने प्रचाराचे रणशिंग महाराष्ट्र राज्यात त्यांच्याद्वारे फुंकले गेले आहे.
लोकशाहीचे खरे लक्षण म्हणजे निवडणूकांच्या मतदान पुर्व विजयाचे दावे न करणे होय.मतदान पुर्व विविध पक्ष जेव्हा उमेदवार निवडून येण्याचे दावेप्रतिदावे करतात तेव्हा लोकशाही अंतर्गत निवडणूक प्रक्रियावर त्यांचा भरोसा नसणे होय किंवा निवडणूक प्रक्रिया हे अलोकशाही मार्गाने करणे होय आणि मत प्रक्रियावर प्रभाव पाडणे होय.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर,युवा नेते सुजात आंबेडकर यांनी तर नगरसेवकांच्या प्रचाराची धुरा सांभाळली असून अख्या महाराष्ट्र राज्यात स्वतःच्या पक्षाच्या उमेदवारांची विजय स्थिती मजबूत केली आहे.
बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी हे राजकीय पक्ष राज्यातील व देशातील नागरिकांच्या अधिकारांना डावलून भांडवलदारी विचारांना प्रोत्साहन देत नाही.
याचबरोबर या दोन्ही पक्षाचे पक्ष प्रमुख आणि पदाधिकारी,कार्यकर्ते बोललेल्या शब्दांना जागतात.यामुळे या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांना निवडून देण्याची जबाबदारी हे मतदारांची असली पाहिजे.
तद्वतच नगरपालिका अंतर्गत होणारे नियोजन,निर्णय हे स्थानिक नागरिकांच्या हिताचे असायला पाहिजे याकडे ते लक्ष केंद्रित करतात..
२९ महानगरांच्या नागरिकांना महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या नियोजनाची व निर्णयाची सत्य व वास्तविक माहिती हवी असेल आणि त्यांच्या विरोधात महानगरपालिका सभागृहात नियोजन व निर्णय होऊ नये असे वाटत असेल तर मतदारांनी रुपयांना महत्व देऊन मतदान करु नये,असा आशावाद बाळगायला हरकत नाही.
वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे,ज्यांची स्थापना प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.या पक्षाची वैचारिक प्रणाली संविधानवादी,आंबेडकरवादी,धर्मनिरपेक्षता,समाजवादी,पुरोगामी आहे.
समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांसोबत युती किंवा आघाडी या पक्षाच्या प्रमुखांनी केली आहे.
बहुजन समाज पक्ष हा भारतातील तिसरा सर्वात मोठा राष्ट्रीय राजकिय पक्ष आहे.हा फुले,शाहू,आंबेडकरवादी,समाजवादी,लोकशाही या विचारसरणीचा एक राजकीय पक्ष आहे.
हा पक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांस अनुसरून बहुजनहिताच्या उद्दिष्टाचा दावा करतो.इ.स. १९८४ साली मान्य कांशीराम यांच्या नेतृत्वाखाली याची स्थापना झाली.
इ.स.२००३ सालापासून बहन मायावती या पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत.हत्ती हे या पक्षाचे चिन्ह आहे. इ.स. २००९ साली झालेल्या भारताच्या पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकींत या पक्षाने २१ जागा जिंकल्या.त्यायोगे पंधराव्या लोकसभेतील पक्षीय बलाच्या निकषावर हा चौथ्या क्रमांकाचा पक्ष होता.
एकंदरीत वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पार्टी हे भांडवलशाहीच्या धोरणा विरोधात असल्याने ते देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी, उन्नतीसाठी इमानदारीने सदैव संघर्ष करताना दिसतात आणि भारतीय संविधानाच्या चौकटीत त्यांचे अधिकार कायम राहावे म्हणून आंदोलन करतात.
यामुळे आता होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीचे आणि बहुजन समाज पार्टीचे नगरसेवक मतदारांनी निवडून दिले पाहिजे,असा आशावाद दोन्ही पक्ष प्रमुखांना असेलच!


