मुरुमगावं येथे भारत विकसित संकल्प यात्रा कार्यक्रमाचे आयोजन…

 भाविक करमनकर

धानोरा तालुका प्रतिनिधी 

           धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथे दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोज शुक्रवार ला महसूल संकूल मंडल कार्यालय मुरुमगाव यथे भारत विकसित संकल्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी सभापति अजमन राऊत पचांयत समिति धानोरा, या कार्यक्रमचे अध्यक्ष सरपंच शिवप्रसाद गवरना ग्रामपंचायत मुरुमगाव, व प्रमुख उपस्थिती बैसाकूराम कोटपरीया मुरुमगाव, केन्द्र प्रमुख सातपुते सर , ग्रामसभा अध्यक्ष पार्वतीबाई गवरना अध्यक्ष महिला बचत गट चमेलीबाई शाहू ,वैद्यकीय अधिकारी राहूल बनसोड प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव, क्षेत्र साहाय्यक देशपांडे पक्षिम मुरुमगाव, मंडल अधिकारी प्रमोद धाईत मुरुमगाव, तलाठी मेश्राम सावरगाव, तलाठी लाडवे मुरुमगाव, तलाठी साई कोडाप कोसमी, ग्रामसेवक जयतं मेश्राम ग्रामपंचायत मुरुमगाव, कृषि सेवक डी.व्ही. उसेंडी मुरुमगाव, तालूका पत्रकार मो.शरीफ भाई कूरेशी धानोरा, कोतवाल खिलेनद्रं गवरना, शशी जाडे, गिता जाडे, गुरुदास पोया, रोशन धुर्वे, संजय पूडो, रंजू कोठवार, संजय पूडो, उमेश मडावी, भागरथा हलामी, रमसीला हिळको, माधूरी कूजाम इत्यादींने आपली उपस्थित होते.

           या कार्यक्रमात पशू संवर्धन विभाग गडचिरोली यांनी पशुधन बिमा योजने बदल माहिती दिली.भारतीय स्टेट बँक ऑफ धानोरा यांनी मुख्यमंत्री महिला शाशक्तीकरण योजना व पंतप्रधान सुरक्षा बिमा योजना, व सामान्य बिमा योजनांवर माहिती देण्यात आली,कृषि विभागा तर्फे शेती विषयक पिएम किसान माहा डिबीटि, पिएम एफ एम ई ,पिक नुकसान गोपीनाथ मूंडे अपघात बिमा योजना व माती परीक्षण बद्दल माहीती देण्यात आले, महसूल विभागाकडून संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, राष्ट्रीय कुटूंब साहाय्यक योजनांवर लाभ मिळवून देण्यात येणार असे माहिती देण्यात आले, ग्रामिन बँक मुरुमगाव याने शासकीय योजनांवर लाभ मिळणार याची परिपूर्ण माहिती दिली, कृषि विभागाकडून शेतीत ड्रोन च्या सहाय्याने फवारणी करीता डेमो करून दाखवण्यात आले. ग्रामपंचायत मुरुमगाव तर्फे मोदी आवास योजनेंतर्गत मिळणारा लाभ व इतर लाभ ची माहित देण्यात आली. उपस्थीत जनतेला उज्वला प्रधानमंत्री योजने चा लाभ व आयुष्यमान भारत कार्ड व गोल्डन कार्ड, आभा कार्ड चे लाभ मिळवून देण्यात आले.

          या उपक्रमाचे संचालन राकेश उईके यानी केला तर प्रास्ताविक मंडल अधिकारी प्रमोद धाईत मुरुमगाव यांनी केला तर आभार प्रदर्शन ग्रामसचिव जयतं मेश्राम यांनी केले