अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी..

     रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

         अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ. सतिशभाऊ वारजूकर यांनी शासनाकडे पाठपुराव्याला अनुसरून केली आहे.

           चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.

           त्यात प्रामुख्याने धान, कापूस, सोयाबीन, ऊस, मुंग,  उडीद, भुईमुग व ईतर पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला आलेले पीक वाया गेल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

           त्यामुळे त्यांचे न भरुन येणारे नुकसान झालेले आहे.यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यात वेळ न घालवता शेतकऱ्यांना एकरी सरसकट १५ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी डॉ.सतिश वारजूकर यांनी मागणी केली आहे.