Home Political नामांकनासाठी ऑनलाइन सुविधा,निवडणूक निर्णय अधिकारी श्रिधर राजमाने (तहसीलदार) यांची माहिती… —...

नामांकनासाठी ऑनलाइन सुविधा,निवडणूक निर्णय अधिकारी श्रिधर राजमाने (तहसीलदार) यांची माहिती… — चिमूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक…‌

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी..

          आगामी चिमूर नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांना नामांकन अर्ज भरण्यासाठी यंदा ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

       राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुलभ,पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या उद्देशाने ही प्रणाली सुरू केली आहे.उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीधर राजमाने यांनी केले आहे.

        राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर (किंवा महाराष्ट्रासाठी उपलब्ध अधिकृत लिंक) या ठिकाणी उमेदवारांना आपला नामांकन अर्ज ऑनलाइन भरता येणार आहे.

        अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट घेऊन आवश्यक कागदपत्रांसह निवडणूक अधिकारी कार्यालयात नियोजित कालावधीत प्रत्यक्ष सादर करणे बंधनकारक आहे.

       अर्ज सादरीकरणासाठी उमेदवाराने आपले ओळखपत्र, मतदानाचा पुरावा,तीन पासपोर्ट साईज फोटो,तसेच जामिन रक्कमेचा पावतीचा पुरावा जोडणे आवश्यक आहे.

        ऑनलाइन प्रणालीमुळे अर्जातील चूक,त्रुटी व पुनर्प्रक्रिया टाळली जाणार असून उमेदवारांना वेळ आणि श्रमाची बचत होईल.तहसील कार्यालयात उमेदवारांसाठी सहाय्यता केंद्र सुरू करण्यात आले आहे.येथे कर्मचाऱ्यांकडून अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन दिले जाईल. 

        उमेदवारांना ई-मेल आणि मोबाईल क्रमांकाद्वारे देखील तांत्रिक सहाय्य मिळणार आहे.निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व उमेदवारांना आवाहन केले आहे,नामांकनाची शेवटची तारीख लक्षात घेऊन वेळेत अर्ज ऑनलाइन भरावा आणि सादर करावा,अन्यथा अर्ज स्वीकारला जाणार नाही. 

       त्यामुळे वेळेत येऊ अर्ज सादर करावे,या ऑनलाइन नामांकन प्रणालीमुळे निवडणुकीतील पारदर्शकता,अचूकता आणि तत्काळ माहिती उपलब्धता वाढणार असून चिमूर नगर परिषद निवडणुकीत ही प्रक्रिया अधिक कार्यक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. 

        ही निवडणूक चांगल्या व उत्कृष्ट पध्दतीने पार पाडण्यासाठी आचारसंहितेचे पालन करावे,मतदारांनी कोणत्याही प्रलोभन व दबावाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजाविण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी श्रीधर राजमाने यांनी केले आहे.

          या पत्रकार परिषदेला तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीधर राजमाने,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपरिषद मुख्याधिकारी अर्चना वंजारी,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार देविदास निकुरे उपस्थित होते.

      @ अशी आहे खर्च मर्यादा..

निवडणूक आयोगाने ‘क’ वर्ग नगरपरिषद क्षेत्रातील थेट नगराध्यक्ष पदासाठी खर्च मर्यादा ७ लाख ५० हजार रुपये,सदस्य खर्च मर्यादा २ लाख ५० हजार रुपये,तसेच नगर पंचायत क्षेत्रातील थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी खर्च मर्यादा ६ लाख आणि सदस्य पदाच्या उमेदवारासाठी खर्च मर्यादा २ लाख २५ हजार रुपयापर्यंत निश्चित करण्यात आले आहे.

    @ नगर परिषद चिमूर…

आरक्षण : नगराध्यक्ष अनुसूचित जाती महिला

एकूण प्रभाग : १०

एकूण मतदार : २२५५७

पुरुष मतदार : १११६५

महिला मतदार : ११३९२